सरस्वती विद्यालयात गणवेश वितरण
तळोधी (बा.)
नागभीड तालुक्यातील कोजबी (चक) येथील सरस्वती विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वीर बाबुराव शेडमाके यांच्या शहीद दिनानिमित्त गणवेष वितरण कार्यक्रम जनकल्याण बहुउद्देशिय शिक्षण संस्था नवरगाव तर्फे गुरुवारी करण्यात आला. सरस्वती विद्यालयात ग्रामीण भागातील गरीब व होतकरु विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोनाच्या दुस-या महामारीमध्ये अनेक पालकांना जीवन जगणे जिकीरीचे झाले.त्यातच आपल्या पाल्यांना शालेय गणवेष घेऊन देणे दुरापास्त होत आहे. या बाबीचे गांभीर्य लक्षात घऊन तसेच विद्यार्थीहीत व समाजऋण समोर ठेवून जनकल्याण बहुउद्देशिय शिक्षण संस्था नवरगाव तर्फे वर्ग ५ ते १० च्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेष वितरण नुकतेच करण्यात आले. या वितरणाप्रसंगी संस्थाध्यक्ष विजय बारापात्रे, सचिव मनिषाताई बारापात्रे, सदस्य डाॅ.सुधाकर नवलाखे, रमेश मस्के, गीताताई बारापात्रे, संकेत बारापात्रे, नागपूर येथील श्रीमती मिनाक्षी धार्मिक, मुख्याध्यापक दीपक बोकडे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!