गावात व्यायाम शाळा (जीम) उघडन्या करीता 'स्वाब नेचर केअर संस्था'ने दिले निवेदन
तळोधी बा (प्रतिनिधी)
ग्राम पंचायत सावरगाव येथे आज स्वाब नेचर केअर संस्था द्वारे निवेदन देण्यात आले.
गावातील युवकांची मागणी लक्षात घेऊन व नवयुवकांना सुदृढ शरिरयष्टी घडविण्यासाठी, गावातील युवकांत व्यायाम बद्दल आकर्षण निर्माण होने करीता. त्यांना लागणारी व्यायाम शाळा (जीम) उघडन्या करीता सावरगाव ग्राम पंचायत येथे स्वाब नेचर केअर संस्था'चे वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री यशवंत कायरकर, सहसचिव हितेश मुंगमोडे, सदस्य विकास बोरकर, सचीन निकुरे, महेश बोरकर, प्रतीकार बोरकर, वेदप्रकाश मेश्राम, कमलकिशोर चुनारकर, यांची उपस्थिती होती. तर ग्राम पंचायत सावरगाव येथील लिपिक श्री लोकेश राऊत, नाना निकुरे यांनी निवेदन स्वीकारले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!