आय.टी.आय. प्रवेशासाठी समुपदेशन फेरी ची पुन्हा सुवर्ण संधी

आय.टी.आय. प्रवेशासाठी समुपदेशन फेरी ची पुन्हा सुवर्ण संधी

गडचिरोली (प्रतिनिधी )- 
आजवर झालेल्या  प्रवेश फेरीमध्ये ज्या उमेदवारांना कोणत्याही व्यवसायात प्रवेश मिळाला नाही अश्या उमेदवारांनी दि.२६ आक्टोंबर पर्यंत  नव्याने अर्ज  करता येईल . अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची मेरीट लिस्ट २७ आक्टोबरला संस्थेत लावण्यात येईल. त्यानंतर २८ आॕक्टोंबर पासून  समुपदेशन प्रवेश फेरी सुरू होईल.ही  शेवटची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. 
  तरी उमेदवारांनी  समुपदेशन प्रवेश फेरीसाठी नव्याने आॕनलाईन अर्ज करावा.जागा उपलब्ध असल्यास  उमेदवारांच्या  मेरीटनुसार त्यानुसार प्रवेश मिळेल. तसेच  प्रवेशासाठी येताना स्वतःचे मूळ कागदपत्र / प्रमाणपत्र (छायांकित    प्रती २ संचासह ) ,प्रवेश फि रक्कम व २ पासपोर्ट फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. औ.प्र.संस्थेच्या प्रवेशासाठीची ही संस्थास्तरावरची शेवटची संधी असल्याने प्रवेशासाठी इच्छूक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा ,असे आवाहन गडचिरोली औ.प्र.संस्थेचे  प्राचार्य संतोष सांळुके यांनी केलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!