रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई : बल्लारशाह रेल्वे स्थानकावर पोलिसांनी पकडला १३० किलो गांजा आंध्रप्रदेश मधून महाराष्ट्रात तस्करी होणार होती.

रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई : बल्लारशाह रेल्वे स्थानकावर पोलिसांनी पकडला १३० किलो गांजा आंध्रप्रदेश मधून महाराष्ट्रात तस्करी होणार होती.

प्रतिनिधि वसंत मुन

बल्लारपूर :- काल २० ऑक्टोम्बरला जीआरपी पोलीस बल्लारशाह/वर्धा रेल्वे पोलिसांनी बल्लारशाह रेल्वे स्थानकावर आंध्रप्रदेश एक्स्प्रेस(AC) रेल्वे मधून तब्बल १३० किलो ४६५ ग्राम गांजा जप्त केला असून सदर कारवाई वर्धा रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक सरवदे यांनी केली आहे. 


            या संदर्भात विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार सदर गांजा हा बेवारस स्थितीमध्ये पडून होता त्यामुळे आरोपीला अटक करता आली नाही सदर गांजाची आंध्रप्रदेशातून महाराष्ट्रात तस्करी होत असल्याची माहिती असून १३० किलो गांजाची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर गांजाची तस्करी प्रकरणी सद्यस्थितीत तरी जिल्ह्यातील  मोठी कारवाई आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जीआरपी पोलीस बल्लारशाह/वर्धा करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!