अनिकेत मारकवार राष्ट्रवादीत

अनिकेत मारकवार राष्ट्रवादीत




मूल (प्रतिनिधी)


मूल पंचायत समितीचे माजी सभापती स्वर्गीय संजय पाटील मारकवार यांचे चिरंजीव अनिकेत संजय पाटील मारकवार यांनी नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत प्रवेश घेतला आहे.  जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा बेबीताई उईके, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बल्हारपूर विधानसभा अध्यक्ष सुमीत समर्थ यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून अनिकेत यांनी हा प्रवेश घेतला आहे.
अनिकेत मारकवार यांचे सोबत धनगर समाजाचे नेते निकेश म्याकलवार यांनीही यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. 
अनिकेत मारकवार यांचे राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे युवकांत चैतन्य निर्माण झाले आहे. 
स्वर्गीय संजय पाटील मारकवार हे कॉंग्रेसचे लोकप्रिय नेते होते.  त्याचे मृत्युचे पश्चात कॉंग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली होती.  ही जागा कॉंग्रेसमध्ये अनिकेतच्या माध्यमातून भरली जाईल अशी अपेक्षा असतांनाच, अचानक अनिकेतनी हातात घड्याळ बांधल्यांचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


मूल तालुक्यात मागील काही महिण्यापासून राष्ट्रवादीचे बल्हारपूर विधानसभा अध्यक्ष सुमीत समर्थ यांचे नेतृत्वात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते पक्षात प्रवेश करीत असून, आंदोलनही उत्साहात होत असल्यांने, तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जोर वाढत असल्यांची चर्चा आहे.
x
x

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!