आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद,विविध विषयांना घेऊन २७/१०/२०२१ पासुन करणार आमरण उपोषण

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद, पवनी विविध विषयांना घेऊन २७/१०/२०२१ पासुन उपोषणाला बसणार असून मागणी क्र.१) तहसीलदार व उप विभागीय अधिकारी यांनी माहिती अधिकारातील माहिती न देणे, माहिती खोटी व बनावटी पुरविणे,गाडी नं.एम.एच. ३६ झेड २४०८ या खाजगी वाहनात पेट्रोल/डिझेल शासकीय तिजोरीतून भरून शासकीय पैशाची चोरी करणे, खाजगी वाहण चालकाचे पचार व भत्ता कुठून दिल्याचे चारित्र चौकशी करणे, गैरअर्जदार नं.२ चे आदेश न घेता रेती व मुरूम मचे ट्रक व ट्रॅक्टर स्वमर्जीने सोडून शासकीय महसूल बुडविणे, अशाप्रकारे लक्ष्मीलीला करणाऱ्या गैर अर्जदार नं. १. तहसिलदार व नं.२. उपविभागीय अधिकारी भंडारा अधिकान्यांची कसून चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी. २) वरील बेशिस्त बेजबाबदार असणाऱ्या अधिकारयांची चौकशी करून कार्यवाही करण्या बाबत जिल्हाधिकारी भंडारा यांना दिनांक २३/०७/२०२१ ला दिलेल्या पत्रा नुसार कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली / झालेली नाही. ३) जिल्हाधिकारी साहेब भंडारा यांनी व पोलीस स्टेशन पवनी यांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्याने प्रताडित होऊन गैरअर्जदार विरुध्द कार्यवाही करण्याच्या न्याय मागणी करीता दिनांक २७/१०/२०२१ ला तहसिल कार्यालय पवनी समोर दुपारी ११.०० वाजता पासुन आमरण उपोषण करीत आहोत. ४) करीता आपणांस संनम्र विनंती आहे की, आपण दिनांक २७/१०/२०२१ पासून तहसिल
कार्यालय पवनी समोर दुपारी ११.०० वाजता पासुन आंतर राष्ट्रीय मानवाधिकार मंडळासह 
आमरण उपोषण करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!