तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी अखिल गांगरेड्डीवार तर सचिवपदी हिमानी वाकुडकर

तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी अखिल गांगरेड्डीवार तर सचिवपदी हिमानी वाकुडकर

मूल (अमित राऊत )

तालुक्यातील सरपंच व उपसरपंच यांच्या सभेत मूल तालुका सरपंच संघटनेची पुर्नरचना करण्यात आली. स्थानिक पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या संघटनेच्या सभेत झालेल्या चर्चेनुसार भेजगाव येथील सरपंचांची संघटनेच्या अध्यक्षपदी तर नांदगाव येथील सरपंच अॅड. हिमानी वाकुडकर यांची सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली.

कोसंबी येथील सरपंच रवींद्र कामडी यांची उपाध्यक्ष राजोली येथील सरपंच जितेंद्र लोणारे यांची कोषाध्यक्ष आणि काजुताई खोब्रागडे केळझर यांची सहसचिव आणि राहुल मुरकुटे ताडाळा यांची प्रसिद्धी प्रमुख पदावर एकमताने निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून करुणा उडे बेबाळ योगीता गेडाम दाबगाव, यशवंत बोंडाळा यांची निवड करण्यात आली. आदर्श खोब्रागडे नवेगाव भुजला उपसरपंच दुर्वास कडस्कर चिखली, उपसरपंच सूरज चलाख चिचाळा, प्रदीप चढई विरई, हरीभाऊ येनगंटीवार बोरचांदली, वासुदेव वाघ गांगलवाडी पलिंद्र सातपुते उथळपेठ, उपसरपंच अतुल बुरांडे दाबगाव, जालींदर बागरे,ग्राम राजगड येथील उपसरपंच चंदूपाटील मारकवार हे संघटनेचे सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळतील, संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष अखील गांगवार हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असून सामाजिक, राजकीय क्षेत्रात नावलौकीक प्राप्त आहेत. त्यामुळे भविष्यात सरपंच व उपसरपंच यांच्या समस्या सोडविण्यास गांगरेड्डीवार यांचा सक्रिय सहभाग राहणार असल्याचा विश्वास उपस्थित सरपंच व उपसरपंच यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!