स्वातंञ्याच्या ७५ वर्षानंतरही चिमूर तालुक्यातील चिखलापार गावाला रस्ताच नाही
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - चंद्रपुर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील चीखलापार हे गाव पुरातन काळापासुन चिमूरच्या पुर्वेस ६ कि.मी.अंतरावर वसलेले आहे . या गावाला तीनही बाजुने नदीने वेढलेले आहे.गावातील जनतेला गावाबाहेर निघण्यास एकही मुख्य रस्ता नसल्यामुळे येथील नागरीकांना दळण - वळण करण्यासाठी नाहक ञास सहन करावा लागत आहे.चिखलापार येथील विद्यार्थ्याना शाळेत जाता येत नाही . शेतकऱ्याना मजुर मीळत नाही.तसेच शेतीला लागणारी खते , बी - बीयाणे , औषधी आणता येत नाही . व्यावसायीकांचा व्यवसाय चालत नाही . तसेच एखादी व्यक्ती जर बीमार पडली तर त्याला आपल्याच गावात , स्वतःच्या घरी औषधोपचारावीना मरावे लागते.२०२० मध्ये चिखलापार गावात महापुर आला होता. सावरगांव येथील तलाव फुटण्याच्या बेतात होता. संपुर्ण गावाला चारही बाजूने पाण्याने वेढलेले होते. त्यामुळे गावातील जनतेला वाचवीण्यासाठी उप विभागीय अधीकारी चिमूर यांनी नदीतुन बाहेर काढण्याकरीता नाव बोलावली होती .चिखलापार वासीयांना शेतकरी भवन चिमूर येथे हलवीण्यात आले होते. व तात्पुरती मदत देण्यात आली होती. शेतकरी भवन येथे अनेक पक्षाचे लोकप्रतिनिधी आले होते. सर्वांनी मिळून विकासा संदर्भात आश्वासने दिली होती. व आमदार चिमूर विधानसभा क्षेञ यांनी पाऊस उघडल्याबरोबर काम सुरू करण्याचे कबुल केले होते . माञ हे आश्वासन खोटे ठरले.व शासनानेही चिखलापार या गावाकडे दुर्लक्ष केले.
चिखलापार गावात साधी सायकल सुध्दा जावू शकत नाही. चिखलापार या गावाला शहरांच्या रस्त्यांनी न जोडल्यामुळे तसेच एकाही लोकप्रतिनिधीने तथा शासनाने रस्ता न बनवुन दिल्यामुळे चिखलापार वासीय पुढील येणाऱ्या निवडणुकीवर बहीष्कार टाकणार आहेत. गावच्या समस्या त्वरीत नीकाली न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा प्रकारचे निवेदन चिमूरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांना देण्यात आले. यावेळी चिखलापारचे सरपंच सुमीञा गोहणे , किसन कापसे , उपसरपंच , नीर्मला कापसे , पोलीस पाटील , छबुताई कापसे , रंजना डांगे , वनीता काळे , नीवृत्ता गेडाम , संतोष डांगे , माजी सरपंच , अरूण नाकाडे व शेकडो नागरीक उपस्थीत होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!