वाघ हल्ल्यातील मृतकाचे प्रेत ग्रामीण रुग्णालय नागभीड येथील डॉक्टर चे हलगर्जीपणामुळे तीन तास पडून राहिले.
तळोधी (बा.)(यश कायरकर)
मौजा वाढोना ता.नागभिड़ येथील इसम नामे रमेश जयराम वाघाडे वय 42 वर्षे हा गुराखी असून दिनांक 6/7/2021 रोजी दुपारी 12:00 वाजताच्या दरम्यान वाढोणा गावाला लागूनच असलेल्या जंगल परिसरात गुरेढोरे चराईसाठी गेला असता झुडपात दडुन बसलेल्या वाघाने अचानकपणे हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला ,त्यानंतर त्याचा उपचार कामी प्राथमिक आरोग्य केंद्र वाढोणा येथे नेले असता पुढील उपचारासाठी तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी ग्रामीण रुग्णालय ,नागभिड़ येथे रेफर स्लिप देऊन पाठविले परंतु रस्त्यातच तो मृत पावल्याने ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे उपस्थित असलेले वैद्यकीय अधिकारी यांनी स्थानिक पोलिस स्टेशन ला पुढील कारवाई करिता मेडिकल मेमो देणे अपेक्षित होते परंतु कोणत्याही प्रकारची कारवाई न करता मृतकाचे प्रेत हे ग्रामीण रुग्णालय नागभिड़ येथेच जवळपास 03तास पडून राहिले, ग्रामीण रुग्णालय नागभिड़ येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे हलगर्जीपणामुळे पोस्टमार्टम होण्यास उशीर झाला व त्यांच्यामुळे मृतकाच्या कुटुंबीयांना प्रेत मिळनेस उशिर झाले



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!