स्तोत्र पठणाचे महत्त्व

स्तोत्र पठणाचे महत्त्व 
        स्तोत्र पठणाचे फार महत्व आहे.आधीच्या काळात घराघरात स्तोत्र पठण होत होते.लहानपणापासुनच मुलांना स्तोत्र पठणाची सवय लावली जात.संध्याकाळ झाल्यावर आईने देवघरात दिवा लावला की मुले शुभंकरोती म्हणायला देवघरात जमा व्हायची.मला अजुनही आठवते की आम्ही रोज संध्याकाळी आईने देवघरात दिवा लावला की आम्ही स्तोत्र पठण ,भजन म्हणत असु.संध्याकाळचा आमचा एक तास कसा जायचा कळतच नव्हता. रामरक्षा, मारोती स्तोत्र,वीष्णुसहस्त्रनाम  यांसारखे स्तोत्र पाठांतर असायचे. स्तोत्रपठणामुळे आपल्याभोवती संरक्षण कवच निर्माण होते.स्तोत्रपठणामुळे त्या त्या देवतेचे पाठबळ आपल्याला मिळते. आपण रामरक्षा स्तोत्र पठण केले असेल  तर या स्तोत्रामध्ये आपल्या संपूर्ण शरीराचे रक्षण रामायणातील प्रत्येक व्यक्ती ने केले आहे.समजा आपण मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी जर औक्षवण करताना रामरक्षा म्हटली तर त्या मुलाच्या सर्व अवयवांच्या रक्षणाची जबाबदारी श्रीरामावर येईल आणि श्रीरामाला त्याचे रक्षण करावेच लागेल.मागे एका अंकामध्ये सत्य घटना आली होती.दोघी मुली रामरक्षा म्हणुन रस्त्यावर जात होत्या. तेव्हा त्यांच्या पाठीमागे दोन गुंड लागले. जेव्हा ते गुंड त्यांच्याजवळ आले तेव्हा त्यांनी काहिच न करता समोर चालले गेलेव त्या मुलींना आपल्या भोवती एक वलय तयार झाले आहे असे जाणवले.अशा या स्तोत्रांचे खूप महत्त्व आहे आणि ज्या ज्या ऋषींनी हे स्तोत्र लिहिलेली आहेत.त्या त्या ऋषींचा संकल्प त्या स्तोत्रात कार्यरत झालाआहे. आपण देवी कवच स्तोत्र जर ऐकले तर त्या स्तोत्रात आपल्या संपूर्ण शरिरातील अवयवांचे रक्षण प्रत्येक देवीने केले आहे. असे या स्तोत्राचे खुप महत्व आहे. पुष्कळसे स्तोत्र हे संस्कृत भाषेत आहे.संस्कृत भाषा ही देवभाषा आहे.संस्कृत भाषेच्या पठणाने आपली वाणी शुद्ध होते.आपले मनोबल वाढते.फक्त स्तोत्रांचे  उच्चार योग्य व्हायला हवे. आपल्याला योग्य उच्चार पाठ होण्यासाठी आपण आॅडीओचा पण उपयोग करु शकतो.आता प्रत्येक स्तोत्राचे आॅडीओ पण मोबाईल मध्ये उपलब्ध आहेत.
       आजकालच्या मुलांना काॅन्व्हेटच्या शिक्षणामुळे , मोबाईल ,टि व्ही मुळे स्तोत्रपठणाला वेळच मिळत नाही आहे. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढत नाही आहे.लहान लहान गोष्टींवरून ते चिडचिड करतात. परिस्थिती स्वीकारण्याची त्यांची वृत्ती नसते. एखादी वस्तु मिळवण्यासाठी ते जीद्द करतात.
       म्हणुनच आपण मुलांना लहानपणापासूनच जर स्तोत्रपठणाची सवय लावली तर योग्य तो संस्कार मुलांवर होईल..मुलांना चांगल्या गोष्टींची सवय लागेल.म्हणुनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लहानपणापासून मुलांना स्तोत्र पठणाची सवय लावली जात होती.घरातील वडीलधारी माणसे 
सुद्धा  पहाटे पासुन मुखातून स्तोत्र पठण करत होते.त्यांचेच संस्कार मुलांवर व्हायचे.
     चला तर आजपासूनच  मुलांना आपण स्तोत्रपठणाची सवय लावु या.आपणच त्यांच्यासोबत स्तोत्र पठण करू या.   
  !!रामरामेती रामेती ,रमेरामे मनोरमे,सहस्त्र नामततुल्यम रामनाम वरानने !!
 ईतीश्रीबुधकौशीक वीरचीत रामरक्षा स्तोत्रं संपूर्णम !!
     सौ.भारती जीवन कोंतमवार 
                मुल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!