प्राथमिक स्वास्थ केंद्रात वृक्षारोपण महाएनजीओ व स्वरूपाबशिचा पर्यावरणीय उपक्रम

 
तळोधी (बा)(यश कायरकर) 
     तळोधी (बा) येथून जवळच असलेल्या बाळापूर (बुज) येथील प्राथमिक स्वास्थ केंद्रात महाएनजीओ पुणे व स्वरुपाबशिस वर्धा या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण  करण्यात आले.
   डाॅ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त तसेच स्व. रमेश रमण यांच्या श्रद्धांजली निमीत्त महाएनजीओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य पुणे व स्व. रुख्माबाई पाल बहूउद्देशिय शिक्षण संस्था वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय वृक्ष लागवड व संवर्धन या उपक्रमाअंतर्गत प्राथमिक स्वास्थ केंद्र बाळापूर (बुज) येथे वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी कडूलिंबाच्या १२,कवठ०५, बेल ०१, व शिसम ०७ अशा २५  रोपट्यांची लागवड करण्यात आली.
  प्राथमिक स्वास्थ्य केंद्र बाळापूर येथे वैद्यकिय अधिकारी डॉ. विजय हिवरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. शुभम कायंदे वैद्यकीय चिकित्सक, प्रकाश लोखंडे,औषधी निर्माण अधिकारी,  सिस्टर आरोग्य सहायीका थुलकर सिस्टर , तरीवार सिस्टर,कोंडावार सिस्टर,जगदिश शेंडे,आरोग्य सहायक, रवीन्द्र नागोसे वाहन चालक,सुरेश उंबरकर परीचर, संस्था सचिव हरीश्चंद्र पाल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.विशेष म्हणजे या कार्येक्रमात वर्ग २मध्ये शिकणारा सियाग योगेश खरवडे व आय आय टी ची तयारी करतारा उदय कायंदे या विद्यार्थ्यांनी सहभागी नोंदविला, यात संतोष खल्लोरे,योगेश खरवडे, व विजय गुरनूले या ग्रामस्थांनी सुद्धा वृक्षारोपण केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!