लोकविद्यालय शाळेचा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम




 तळोधी(बा)(यश कायरकर) 
महाराष्ट्र राज्य  माध्यमिक शिक्षण मंडळ नागपुर बोर्ड  अंतर्गत एप्रिल 2021  मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वीच्या  परीक्षेमध्ये दी रूरल एज्युकेशन सोसायटी ब्रम्हपुरी सन१९६० द्वारा संचालित लोकविद्यालय तळोधी(बा) येथील इयत्ता 10वी चा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे  निकाल लागलेला असून यामध्ये शाळेचा निकाल *100 टक्के* लागलेला आहे यामध्ये * कु.चांदणी दिनकर गायकवाड हिला 88.80% गुण  घेऊन ती प्रथम ,कु.प्राजक्ता लक्ष्मण गुरुनुले  87.80% द्वितीय, कु.सुहानी संदीप मोहूर्ले 87.20% तृतीय* प्राप्त केले आहे.
    तसेच, विद्यालयातील 16 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत,63 विद्यार्थी प्रथम श्रेणीत,50 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
 शाळेच्या उत्कृष्ट निकालाबद्दल विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे दी रूरल एज्युकेशन सोसायटी ब्रम्हपुरी चे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व मार्गदर्शक श्री.व्ही. एस.तोंडरे साहेब संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सचिव श्री. आर. एस. राऊत साहेब, व्ही. एस.बगमारे साहेब,ए.आर. नागमोती साहेब,ए.एम.राऊत साहेब,डी.पी.समर्थ साहेब सदस्य दि रूरल एज्युकेशन सोसायटी, मुख्याध्यापक आर.बी.विधाते साहेब,आर.डी. हांडेकर, आर.एम,निनावे,शिक्षक प्रतिनिधी संतोष नन्नावार, सोनल उंबरकर, एस. व्ही. घोडे इतर शिक्षक, शिक्षिका, व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!