जांभुळघाट परीसरात पट्टेदार वाघा चे दैनंदिन दर्शन
जनतेत भिती चे वातावर
तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)
चिमूर : - चिमुर तालूक्यातील मौजा जांभुळघाट परीसरात काही दिवसा पासुन नियमित पने २ ते ३ पट्टेदार वाघा चे दर्शन होत आहे.जांभुळघाट वरून नेरी-चिमुर रोड वर सायंकाळ व सकाळला फिरणाऱ्या नागरीकांना रोड वर किंवा रोड च्या आजू - बाजू ला फिरतानी काही दिवसा पासुन पट्टेदार वाघाचे दैनंदिन दर्शन होत आहे.तसेच शेत-शिवारात शुध्दा शेकऱ्याना पट्टेदार वाघा चे दर्शन होत असुन वाघाच्या दर्शनामुळे या परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.यांचे कारणही तसेच आहे कि दरोज चे चंद्रपूर जिल्हात कुटे ना कुटे घटना वाघाच्या हल्ल्यात मृत्यु झाल्याची घटना नियमित होत आहेत. वनविभागानी या कडे जातीने लक्ष देण्याची गरज आहे.चंद्रपूर जिल्हातीत जंगली प्राण्याच्या वाढत्या संख्येमुळे मानवी व वन्य प्राण्या मध्ये मोठ्या प्रमानात संघर्ष पाहायला मिळत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!