वृक्षारोपण व सफाई कामगारां सोबत सहभोजन करून साजरा केला ५२ वा वाढदिवस

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - वयाचे ५२ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त व्यापारी मंडळाचे सचिव तसेच भारतीय क्रांतिकारी संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते सारंग दाभेकर यांनी चिमूर येथील स्टेडियम मध्ये ५२ कडुलिंबाची रोपटे लावून त्याचप्रमाणे नगर परिषद चिमूर येथील बारा सफाई कामगारांसोबत सहभोजन घेऊन सामाजिक तथा विधायक कार्य करित त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला.दरम्यान सफाई कामगारांसोबत चर्चा करताना त्यांच्या समस्या जाणून  घेतल्या. स्वतःचा जीव धोक्यात टाकून स्वच्छता आणि सफाईची सेवा देणाऱ्या सफाई कामगारांच्या आरोग्याचा नगर परिषदेकडून कोनताहि विचार होत असताना दिसत नाही. सफाई कामगारांना चांगल्या दर्जा चे हॅन्ड ग्लोज, मास्क त्यांना पुरविल्या जात नाही तेव्हा त्यांचे आरोग्य धोक्यात असल्याचे निदर्शनात आले समाजामध्ये सफाई कामगारां कडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत खालच्या दर्जाचं काम कारणारा, अज्ञानी असा असला तरी त्यांनी त्यांच्या कृतीतून उच्च दर्जाच्या विचाराचे प्रदर्शन करून दाखवीत त्यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सारंग दाभेकरांचा सत्कार करून वाढदिवसानिमित्य अभिनंदन केले त्यांची समयसूचकता, आदर सन्माननाच्या वागणुकीबाबत कौतुक करण्यात आले. सफाई कामागार कमी मोबदल्यात समाजात महत्वाचं व महान कार्य करतात त्यांना मिळणारा मोबदला अत्यंत कमी असून नगर परिषदेने त्यात दुप्पटीने वाढ करावी असे मत प्रगट करून जर सारंग दाभेकर यांना नगर परिषदेत नगर सेवक म्हणून संधी मिळाल्यास सफाई कामागारांच्या नक्कीच हिताचे निर्णय घेऊ असे सुध्दा दाभेकर वाढदिवसाचे सत्कार प्रसंगी बोलत होते. 
सायंकाळी बालाजी महाराज व्यापारी मंडळाच्या संचालक मंडळाने सुध्दा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सारंग दाभेकर यांचा ५२ व्या वाढदिवसानिमित्य सत्कार केला. याप्रसंगी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रकाशजी बोकारे, सहसचिव पप्पू शेख, कोषाध्यक्ष प्रदीप साटोने, संचालक रामकृष्ण मडावी, घनाश्याम रामटेके, दिलीप राचलवार, सुरेश जुमडे, जगदीश लाखे  भारतीय क्रांतीकारी संघटनेचे अध्यक्ष डार्विन कोब्रा, विलास भसारकर, जावेद पठाण कैलास भोयर, विलास मोहिनकर , संजय लाखे उपस्थीत होते. 
वाढदिवस कार्यक्रमात व्यत्यय आणण्याच्या दृष्टीने  व कार्यक्रम उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने काही समाजविघातकानी हिंसक घटना घडविण्याचा केविलावाना प्रयत्न केला. सकाळी दहा वाजता पासून त्यांनी कुरापती सुरू केल्या होत्या डार्विन कोब्रा यांच्या गाडीला ट्रॅक्टरने डॅश मारून गाडी पलटी करण्याचा प्रयत्न केला व त्यांनीच उलट वाद घातला गॅरेज मधील लोखंडी सळ्या हातात घेऊन डार्विन कोब्रा यांना मारण्यास त्यांच्या अंगावर धावून गेले.  यामध्ये सारंग धाबेकर यांनी मध्यस्थी करून वाद सोडविण्याचा प्रयत्न केला त्यामुळे दाभेकर यांना निशाना बनवीत दहा पंधरा गावागुंडांच्या सहकार्याने गावात दहशत पसरवून मारहान करण्याचा प्रयत्न केला अश्लील शिवीगाळ केली वेळीच पोलीस घटना स्थळी आले नसते तर त्या ठिकाणी दाभेकरांचा खून झाला असता सत्तेचा माज अंगात आणून व पालक मंत्र्याचा चिमूरातील  समर्थक  म्हणून गावात दहशत पसरवीने रुग्णांना लाखो रुपयाने लुटणे बंद होण्याकारिता पोलीस प्रशासननाने अशा भुरट्या गावगुंडावर कार्यवाही करण्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!