आॅक्सीजन फाॕर एव्हरीवन अंतर्गत वृक्षारोपण अभियान संपन्न

आॅक्सीजन फाॕर एव्हरीवन अंतर्गत वृक्षारोपण अभियान  संपन्न ....
-------------------------
राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे  कार्य- विजय मार्कंडेवार 
---------------------------



चंद्रपूर (प्रतिनिधी )- 

       जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती च्या वतीने सेवाभावनेतून केलेले वृक्षारोपणाचे  कार्य कौतुकास्पद असल्याचे मत ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक विजय मार्कंडेवार यांनी केले.  या  परिषदेच्या  सदस्यांनी आक्सिजन फाॕर एव्हरीवन हा अभिनव  उपक्रम साकार करण्यासाठीआपआपल्या घरी,शेतात,परसबागेत तर काहिनीं मैदानाच्या कडेला  वैयक्तिक स्वरूपात प्रत्येकी पाच झाडांचे  वृक्षारोपण केले तर काहींनी  ५ झाडाची बिजारोपण केले आणि पुढील दोन वर्ष तरी पूर्णपणे काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारली. 


       परिषदेचे सदस्य  विनायक साळवे (बामनी ) ,चंद्रशेखर पिदुरकर (विरखल ), उदय धकाते, सौ. सुचिता धकाते(गडचिरोली ) , दादाजी झाडे ( सुबई ),  त्र्यंबक  बन्सोड (ब्रम्हपुरी) ,विलास उगे ,देवराव कोंडेकर ,अशोक धम्माने  , शंकर दरेकर ( उर्जानगर) तसेच श्रीगुरूदेव   महिला शाखा उर्जानगर यांनी आचार्य लक्ष्मणदादा नारखेडे स्मृतिप्रित्यर्थ  वृक्षारोपण केले.  राजु धोबे यांनी चारवट येथे, महेंद्र दोनाडे यांनी राका येथे स्मृतीशेष पूर्णचंद्र साळवे आणि १६ व्या  संमेलन स्मृतीप्रित्यर्थ नवजीवन विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण केले. भारोसा येथील  हरिश्चंद्र बोढे यांनी  संमेलनाच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण केले. प्रेमदास मेंढुलकर (नवरगाव ), विलास चौधरी (पेंढरी ) तसेच  राजुरा येथे वेगवेगळ्या भागात सुभाष लोहे, रंजना लोहे ,  प्रदीप वासाडे,विठाबाई वासाडे,शैलेश कावळे,मयंक कावळे, मोहनदास मेश्राम ,प्रभाकर बोबाटे,मनोहर बोबडे ,अनिता बोबाटे , अवि पाटील ,सुभाष पावडे,ॲड. राजेंद्र  जेनेकर ,ॲड.सारिका जेनेकर  यांनी वृक्षारोपण केले. चिमूर येथे अशोक चरडे, वैभव चरडे येथे बळीरामदादा कामडी स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण केले.
चेतन ठाकरे यांनी पोवराबाई गोंदोळे स्मृतिप्रित्यर्थ आरमोरी येथे वृक्षारोपण केले.चंद्रपूरात नामदेव गेडकर ,बंडू टेकाम,विजय चिताडे , आण्याजी ढवस , प्रतिभा रोकडे,  कार्तिक चरडे, नारायण सहारे, राकेश बोबडे  यांनी वृक्षारोपण केले . टेकाडी येथे  राजेश सावरकर  , नामदेव पिज्दूरकर यांनी 
राष्ट्रीय हरित सेना उपक्रमाअंतर्गत 
देवनिल विद्यालयात वृक्षारोपण केले. हरिदास पा.मासिरकर स्मृतीप्रित्यर्थ प्रभाकर आवारी यांनी राष्ट्रवादी नगर येथे वृक्षारोपण केले.
तसेच  सौ.अंजलिना  साळवे यांनी  पायली येथे, श्रीक्षेत्र देहु येथील  प्रचारक सुरेश देसाई ,अनिरूध्द देसाई यांनी  मल्हार गड येथे वृक्षारोपण केले. परसोडी येथे नेहा सुर आणि विश्वास सुर यांनी वृक्षारोपण केले तर रामपूर येथे भाऊराव बोबडे,   अनिल चौधरी, श्रध्दा हिवरे यांनी वृक्षारोपण केले. संजय वैद्य  (वरोरा ),सदानंद बोबडे (मुठरा ),  पालिकचंद बिसणे (सिंदीपार), यांनी  वृक्षारोपण केले. मूल येथे गणेश मांडवकर, विलास मांडवकर, सुखदेव चौथाले, चंद्रशेखर पिदुरकर, विजय लाडेकर, गुरुदेव बोदलकर, सौ.प्रभा चौथाले, गणेश चौथाले, शिवम भाजीपाले आदींनी वृक्षारोपण केले.एकूण १२१सदस्यांनी भाग घेत ६१७ रोपे लावण्यात आली.तर मोठ्या प्रमाणात बिजारोपण करण्यात आले. या अभिनव उपक्रमास  ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर आणि  पर्यावरण अभ्यासक विजय मार्कंडेवार  यांचे मार्गदर्शन लाभले. पुढे हे अभियान असेच सुरू राहणार असून बिजारोपणावरही भर देणार आहे.  या अभियानात वड,पिंपळ, चिंच, आंबा आदी रोपट्यांचे वृक्षारोपण करण्यात आले  
       या अभियानात चंद्रशेखर पिदुरकर ,सौ.सुषमा उगे,मंगेश रोगे,प्रणय धांडे,प्रफुल्ल चौधरी,
 उत्तम रोगे ,सौ. कविता टेकाम ,
,विक्की मुठ्ठावार ,अविनाश आत्राम,आरीफ शेख , 
अनिष कातकर,मनिष नेवारे,मोहिनी  कातकर   , पुनेश्वर आघात, निश्चल ईटनकर ,उमंग वैद्य ,प्रकाश ढोबे, पुरूषोत्तम चौधरी, रितेश पिजदुरकर, अंकुश वाणी,,दिनेश खेवले,प्रतिक लेनगुरे ,जय मोहुर्ले, ,हर्षल वाकडे, ,अनूराग मोहुर्ले,रुपेश खोब्रागडे ,सौ.पदमा दोनोडे ,धर्माजी खंगार ,सौ.इंदुताई  वऱ्हाटे ,सौ.शितल पोहनकर सौ.वैशाली चामाटे ,सौ.रुपाली चहानकार , सौ.योगिता  कोंडेकर,खेमदेव कन्नमवार,राजेंद्र लांडे ,संतोष चहानकार,प्रशांत दुर्गे ,ओम सुभाष पावडे आदींनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!