श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे गीताचार्य श्रीतुकारामदादा पुण्यतिथी संपन्न

श्री गुरुदेव  सेवा मंडळातर्फे   गीताचार्य श्रीतुकारामदादा पुण्यतिथी संपन्न 


गडचिरोली (प्रतिनिधी )
        अ.भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळ  शाखेच्या वतीने  कर्मयोगी संत श्रीतुकारामदादा गीताचार्य  याच्या १५ व्या स्मृतिदिनाच्या  निमित्याने सामुदायिक प्रार्थना आणि  श्रध्दाजंली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे होते.
 प्रास्तविक  पंडित पुड़के यांनी केले. याप्रसंगी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , दलित मित्र नानाजी वाढई,   सुखदेव वेठे,अरविंद पाटील वासेकर ,सुरेश मांडवगडे, मधुकर भोयर, कवडू  येरमे आदींनी शब्द पुष्पांजली अर्पण केली. याप्रसंगी कोरोना काळात निधन पावलेले श्रीगुरूदेव भक्त वासुदेव  पत्रे,पुष्पा मेश्राम , किसन पारिसे,वामन सोनुले,आत्माराम  सोनुले, केशव म्हैसकर आदींना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.सूत्रसंचालन पंकज भोगेवार यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!