ग्रामगीता ग्रंथात सांगीतले गेलेले वृक्षारोपण - वृक्षसंवर्धनाचे महत्व...



---------------------------------
ग्रामगीता ग्रंथात सांगीतले गेलेले वृक्षारोपण  - वृक्षसंवर्धनाचे महत्व...
-----------------------------
एक असावा सुंदर बाग !
त्यात मनस्वास्थ्याचेची असावे अंग !
प्रसन्नता वाढाया नाना रंग !
वृक्ष वेली लताकुंज !!अ.१३!!
          
 आपल्याच गावची वृक्षवल्ली !
कंदमुळे आणोनी औषधे केली !
निसर्ग उपचारासहित दिली !
पाहिजेत वैद्ये !!अ.१३!!
     
 सडकांचिया दुतर्फा छान !
सर्वांनी करावे वृक्षारोपण !
ढोले ठेवावे मधामधातून !
कचरा त्यात टाकावया !!अ.१३!!

झाडे दिसती ओळीबध्द !
सरळ,सुंदर,हिरवी शुध्द !
घरमालकची करी खुद्द !
काम आपल्या हातांनी !!अ. १३!!

 घराभोवती बाग केली ! सांडपाण्यावरी झाडे वाढली !
फळाफुलांची रोपे वेली !
भाजीपाला नित्याचा !!अ.१३!!
....✍️ वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज ......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!