पर्यावरण संवर्धनासाठी झगडणारा "बाप"
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - काही माणसं प्रचंड ध्येयवेळी असतात. ध्येय साध्य करण्यासाठी ते कोणत्याही परिस्थितीत दोन हात करीत असतात.कोणत्याही वातावरणात, परिस्थितीत आणि प्रसंगात त्याचे उद्धिष्ट ढळत नसते.अशी माणसं समाजात आपला वेगळा ठसा उमटविण्यात यशस्वी होतात. आज अशाच एका झपाटलेल्या माणसाची कहाणी शब्दबद्ध करण्याचा मोह मला आवरता आलेला नाही.हा माणूस आपल्या मुलांच्या वाढदिवसांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यात यशस्वी झाला आहे.असा हा बाप माणूस आहे,कुशाबराव कायरकर.
चंद्रपूर शहरातील सिस्टर कॉलनी परिसरात राहणारे कुशाब राव कायरकर म्हणजे वेगळेच रसायन. कायम धावत राहणारा हा माणूस कधी थकलेला बघितला नाही.दिवसभर पंजाब नॅशनल बँकेत नोकरी आणि त्यातून वेळ काढून सामाजिक उपक्रम. सामाजिक उपक्रम म्हणजे कुणाच्या छायेत न राहता स्वतः चे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून ऐकला चलो रे...हा मार्ग.त्यासाठी तण, मन, आणि धन हेही त्यांचेच. कुणाकडे हात पसरायचे नाही.कायम संघर्ष करीत राहायचे. या माणसाची ओळख पत्रकारितेत झाली.प्रेस नोट घेऊन येणारे कायरकर कधी मित्र झाले हे कळलेच नाही. दुसरे म्हणजे एकाच वार्डात राहणारे, समस्याही सारख्याच. त्यामुळे आम्ही एकत्र आलो.
अजिंक्यचा वाढदिवस 5 जून चा.जागतिक पर्यावरण दिन.चंद्रपुरातील प्रदूषण हा गंभीर विषय.कुशाब राव यांना पर्यावरणाची जाण. मग त्यांनी मुलाचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करण्याचा संकल्प केला. गेली 25 वर्ष त्यांचा हा लढा आव्हातपणे सुरू आहे.केवळ वृक्षारोपण केले म्हणजे झाले,यातले कुशाबराव नाहीत.झाड लावले की त्याला पाणी देणे,त्याला संरक्षण देण्यासाठी लोखंडी कुंपण लावणे हेही जबाबदारी तेच पार पाडतात.वृक्षाई ही त्यांची सामाजिक संघटना. जागोजागी वृक्षाई चे कठडे दिसतात. काही वर्षे पूर्वी त्यांनी रेल्वे स्थानक परिसरात वृक्षारोपण केले.ती झाडे जगविण्यासाठी ते बँकेचे काम आटोपून पाणी देण्यास जात होते.पाण्यासाठी कुणी शिव्या घालत पण हसून ते पचवत. आज ती झाडे डौलाने उभी आहेत.शहरात ठिकठिकाणी त्यांनी लावलेले वृक्ष शीतल छाया देत आहेत.अजिंक्य इथे असो अथवा नसो,हा बाप त्याचा वाढदिवस वृक्षारोपण करूनच साजरा करणार.खूप लोक त्यांचेवर हसतात.उगीच हा माणूस धावपळ करतो म्हणतात, पण कायरकर साहेब कार्यरत असतात. या वर्षीही त्यांनी करोना योध्याच्या हस्ते वृक्षारोपण करून आपले कर्तव्य पार पाडले.अजिंक्य च्या कार्याची दखल देशपातळीवर घ्यावी यासाठी राष्ट्रपती ते पंतप्रधान आणि राज्यातील सारेच राजकारणी याना त्यांनी पत्रव्यवहार केला आहे.
त्यांचा मुलीचा म्हणजे भूमी चा वाढदिवस 1 जुलै. कृषी दिन. या दिवशीही हा माणूस काहीतरी उपक्रम राबविण्यात गर्क असतो.त्यासाठी मी किंवा प्रकाश चांभारे यांना भेटणार,कल्पना मांडणार आणि मग त्यांची धावपळ सुरू होणार.थकताना मी त्यांना कधी बघितले नाही.कायम जागे.कितीही वाजता आवाज ध्या, ते मदतीला धावून येणार.
कुशाबराव केवळ मुलांच्या वाढदिवसाचा आनंदोत्सव साजरा करतात असे नाही.पर्यावरण संदर्भात कोणत्याही विषयावर ते अग्रेसर असतात.
इरई बचाव....
आम्ही चंद्रपूरची जीवनदायीनी असलेल्या इरई नदीच्या पूरग्रस्त परिसरात राहतो.कायरकर साहेबही या पुराचा तडाख्यात आमच्यापेक्षा अनुभवी. मग ते शांत कसे बसणार. गेली 20 वर्ष इरई बचाव आंदोलनाचे ते अग्रणी आहेत.नदीचे पात्र खोल करण्यासाठी त्यांनी इरईनदी पत्रात लढा दिला.वार्डातील आबालवृद्ध सोबत घेत त्यांनी आंदोलने केली.कायम पत्रव्यवहार करून राजकारणी लोकांना या समस्येवर तोडगा काढण्यासाठी लक्ष केंद्रित करावे लागले.त्यामुळेच आता इरई चे बुजलेले पात्र मोकळे झाले.नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण झाले. घराजवळील नाला खोल झाला,त्यामुळे आता पुराचा धोका कमी झाला.याचे श्रेय कुणाचेही असो,मात्र कायरकर यांनी ही लढाई जिंकली हे मात्र मान्य करावेच लागेल.
आजपर्यंत अजिंक्य वर खूप जणांनी लिहिले,मात्र त्याच्यापेक्षाही वृक्षारोपण ही चळवळ समजून कायमस्वरूपी लढणारे कुशाबराव हे प्रकाशझोतापासून दूर आहेत.पण तेच खरे हिरो आहेत.
शृंखला पायी असू दे...
गतीचे गीत मी गायी....
दुःख उधडावया आता
आसवांना वेळ नाही...
कुशाबराव कुणाच्या सहकार्यची अपेक्षा न करता,त्याचे भांडवल न करता एकटेच लढत आहेत,पर्यावरण संवर्धनासाठी...
अशा अवलिया माणसाला माझ्या शुभेच्छा...
अरविंद खोब्रागडे, चंद्रपूर
9850676782


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!