जांभुळघाट येथील ठेकेदारावर मंजुरी पेक्षा अधिक मुरूम उत्खननाचा आरोप

२ पोकलँड व १ जेसीबी मशीन द्वारे दरोज होते उत्खनन

महसुल विभागाचे दुर्लक्ष

तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)

चिमूर : - चिमुर तालूक्यातील जांभुळघाट येथील मुरूम उत्खनन   लक्ष्मण घाडगे हे मंजूर लीज पेक्षा अधिक उत्खननन करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.  मुरूमचे उत्खनन करीत असतात शासकिय परवानगी असो किंवा नसो उत्खनन सुरूच ठेवत असल्याचाही आरोप आहे.    जांभुळघाट येथे २ पोकलँड व १ जेसीबी मशीन द्वारे उत्खनन सुरूच आहे. तलाठी यांना विचारना केली असता लीज काढलेली आहे असे सांगण्यात आले पण उत्खननासाठी किती वाहानाची परवानगी देण्यात आली आहे. याचे कोणतेही उत्तर संबंधितांकडे नाही. जेसीबी पोकलांड द्वारे उत्खनन करावयाचे असल्यास त्याची वेगळी परवानगी घ्यावी लागते. अशी परवानगी संबंधितांनी घेतली आहे काय याबाबत कोणताही खुलासा झालेला नाही. या उत्खनन ठिकाणी २ पोकलँड १ जेसीबी मशीन व्हायवा ट्रक, ट्रक व ट्रॅक्टर द्वारे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे.या वाहनाद्वारे अनेक ठिकानी मुरूम टाकण्यात येत आहे.या ठिकाणी दिलेल्या उत्खननाच्या परवानगीच्या दुप्पट उत्खनन नेहमीच होत असते.व महसुल विभाग पुर्ण पणे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असतात. यामुळे मुरूम उत्खनन करणाराची  हिम्मत वाढत चालली आहे. खर तर यासंदर्भात देखरेख तलाठी व मंडळ अधिकाऱ्याची असते. किती ब्रास उत्खननाची परवानगी देण्यात आली आहे त्या नुसार उत्खनन केले की जास्त प्रमाणात उत्खनन झाले आहे हे मोजमाप करून तहसील मध्ये माहीती दयायला पाहिजे.पण अशा प्रकारची महसुल विभागा कडून कुठल्याही प्रकारची चौकशी होत नसल्याने मनमानी कारभार ठेकेदार करीत आहे.अशा मुरूमाचे उत्खनन करणाऱ्याना महसुल विभागाचाच आशिर्वादच आहे अशी चर्चा मोठ्या प्रमाणावर जनतेमध्ये होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!