उपक्रमशील शिक्षक संतोष नन्नावार यांचा सन्मान




 तळोधी (बा.) (यश कायरकर) 
राज्यातील नवउपक्रमशिल शिक्षक व अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, तसेच राज्यातील उत्कृष्ट नवोपक्रम इतर शिक्षकांना माहिती व्हावे यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2019 -20 ही पाच गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे पार पडला.या कार्यक्रमाकरीता मा.धनंजय चाफले प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर,डॉ.प्रल्हाद खुणे सर जेष्ठ अधिव्याख्याता, डॉ.ज्योती राजपूत अधिव्याख्याता, डॉ.संजय मेश्राम सर अधिव्याख्याता जिल्हा समन्वयक यांच्या उपस्थितीत हा बक्षीस वितरण सोहळा पार पळला.
या स्पर्धेमध्ये प्राथमिक (इयत्ता६ ते८ ) या गटात दि रूरल एज्युकेशन सोसायटी ब्रम्हपुरी सन १९६० द्वारा संचालीत लोक विद्यालय तळोधी(बा) येथील उपक्रमशील शिक्षक संतोष दामोधर नन्नावार यांनी तयार केलेल्या प्राथमिक  (इयत्ता६ ते८ )या गटात ' *समृद्ध पर्यावरण रक्षणासाठी प्लॅस्टिकमुक्त शाळा ,तळोधी(बा)शहर आणि वृक्षसंवर्धन'* हा नवोपक्रम तयार  करून तो राबविला.या राबविलेल्या उपक्रमाची जिल्हास्तरीय उत्कृष्ठ नवोपक्रम म्हणुन निवड करण्यात आली.त्याच्या या उत्कृष्ठ  कार्याबद्दल चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
    सहा. शिक्षक संतोष नन्नावार हे विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी नेहमी धडपड असतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी व पर्यावरण संरक्षणासाठी हा नवोपक्रम राबविला.
त्यांच्या उत्कृष्ठ यशाबद्दल दी रूरल एज्युकेशन सोसायटी ब्रम्हपुरी(सन1960) द्वारा संचालित लोक विद्यालय तळोधी(बा)चे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  श्री.व्ही. एस. तोंडरे साहेब,संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सचिव श्री. आर.एस.राऊत साहेब, व्ही.एस.बगमारे, ए. आर. नागमोती, ए.एम.राऊत, डी.पी.समर्थ सदस्य दि रूरल एज्युकेशन सोसायटी, मुख्याध्यापक आर.बी. विधाते, धनंजय राऊत,रवींद्र निनावे,रवींद्र हांडेकर, प्रकाश बुराडे,अंबादास कोहळे, पि. एम. कामडी, प्रविण नाकाडे,पुंडलिक काटकर, पद्माकर निखारे, डी.आर.रेहपाडे, प्रकाश गिरडकर,अजय सगळाम, पद्माकर रामटेके इतर शिक्षक, शिक्षिका, व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी त्यांचे कौतुक केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!