वटपौर्णिमेला वडाचे रोपटे लावून पर्यावरण संवर्धनाचे केले आवाहन
वटपौर्णिमेला वडाचे रोपटे लावून पर्यावरण संवर्धनाचे केले आवाहन
प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर
तहसिल कार्यालय समोरील शतकांपूर्वीचे वटवृक्ष वादळामुळे कोलमडून पडले. वटपौर्णिमेला दरवर्षी या वटवृक्षाची पूजा सुवासिनी करत असे. हे लक्षात घेऊन येथिल जागेवर नगराध्यक्ष प्रा. रत्नमाला भोयर यांनी वडाचे रोपटे लावून तेथील रिक्त जागा पुन्हा एका वटवृक्षाचे रोपटे लावून भरून काढली.वडाची फांदी तोडून पूजा करण्यापेक्षा सुवासनीने रोपटे मागवून पूजा करावी व रोपटे मोठे झाले की आपल्या परिसरातील मोकळ्या जागेत लावावीत .असे आवाहन केले. यावेळी नगरसेविका प्रभा चौथाले, भाजपा जिल्हा सरचिटणीस व अध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड च्या संजिवनी वाघरे,ममता कंठीवार, शुभांगी भोयर, पत्रकार कुमूदिनी भोयर उपस्थित होत्या.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!