बल्लारपूर बस स्थानक परिसरात तबल एकेविस किलो गांजा पकडला,
आज दिनांक 24/06/2021 रोजी पोलीस ठाणे बल्लारशा येथील पोलीस निरीक्षक श्री उमेश पाटील यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे अनवेशन विभागातील सपोनि श्री गायकवाड याना बतमीदारा कडून एका कार मध्ये अमली पदार्थ असल्याचे बातमी मिळाली त्या प्रमाणे पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे मदतीने पंचासमक्ष सापळा कार्यवाही करिता रवाना होऊन नवीन बस स्टॉप समोरून जाताना सदर कार ही मूलचंदनी किराणा स्टोर्स समोर मोकळ्या जागेत उभी असल्याचे माहिती मिळाली त्याठिकाणी छापा टाकला असता कार क्रमांक TS 02 FD 6090 मध्ये दोन इसम दिसून आल्याने पंच, कार्यकारी दंडाधिकारी समक्ष, पो नि उमेश पाटील यांचे मार्गदर्शना खाली सपोनि श्री गायकवाड यांनी पोलीस अधिकारी/कर्मचारी यांचे मदतीने कार ची झडती घेतली असता कार मध्ये एकूण 21 किलो 470 ग्राम गांजा किंमत 2,14,700/- रु कार TS 02 FD 6090 किंमत 2,50,000/- रु असा एकूण 4,64,700/- रु चा माल मिळून आला.
आरोपी नामे (1) जयपाल गोपाल एडला वय 37 रा. पेद्दपली (तेलंगणा) (2) हरीश सत्यम शामराव वय 33 वर्ष रा धर्मपुरी (तेलंगणा) यांना पोलीस स्टेशन येथे आणून त्यांचे विरुद्ध अप क्रमांक 714/ 2021 कलम 8 (क),20(ब)ii (क) NDPS Act अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली सदर कार्यवाही मध्ये उपरोक्त अधिकारी सपोनि मुलांनी PSI टेंभुर्णी , चांदोरे, मोहतरे पो हवा श्री जीवतोडे परचके, नापोशी श्री दांडेवार, कुडे, पाटील,वरघणे, पोशी डोरलीकर, पुरडकर, वाभीतकर, हेडाऊ, माने, चालक श्री ढवास,कैलास यांनी सहभाग घेतला



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!