कोसरसार ग्रामपंचायत ला निधी उपलब्ध करुन देण्यात यावे यासाठी प्रहार सेवक यांनी अतिरिक्त मुख्ख कार्यकारी अधिकारी यांना दिले निवेदन

सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी : - वरोरा तालुक्यातील कोसरसार ग्रा.पं.गावाच्या विकासासाठी निधी कमी पडत असल्याने कोसरसार हे गाव विकासापासून दूर जात आहे , गाव विकासाच्या पायरिवर आणण्या करीता सरपंच व उपसरपंच यांनी गावातील काही  प्रमुख मागण्या म्हणजेच १)गावातील मुख्य प्रो.मंजूर करण्यात यावे.
२) मौजा कोसरसार येथे व्यायाम शाळा देण्यात यावे.
३)लाभणसराड धरण ते नदी हि अंदाजे ३ ते ४ कि.मी.लांब आहे त्या नाल्याला पुर येतो त्या पुरात हजारो एकर जमिन पाण्याखाली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना पुरबुडाई  मुळे कोणतही उत्पादन होत नाही त्यामुळे नाला खोलीकरण व रुंदीकरण करण्यात यावें या प्रमुख मागण्या सह प्रहार सेवक यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले. त्यावेळी उपस्थित प्रहार सेवक शेरखान पठान , कोसरसार येथिल सरपंच गणेश मडावी व उपसरपंच अमित बाहादूरे व प्रहार सेवक  गणेश उराडे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!