मूल येथे ओबीसींच्या विविध मागण्यासाठी निदर्शने
मूल (अमित राऊत)
राष्टीय ओबीसी महासंघातर्फे ओबिसींच्या विविध 33 मागण्यांना घेवुन आज मूल येथे निदर्शने करण्यात आली.राष्टीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते गांधी चौकात एकत्र येऊन प्रशासकिय भवनासमोर मोर्चा नेण्यात आला. यावेळी निदेर्शने करीत उठ ओबिसी जागा हो या देशाचा धागा हो, ओबीसींच्या मागण्या पुर्ण झाल्याचा पाहिजे असे विविध नारेबाजी करण्यात आली.
ओबिसी समाजाची जातीनिहाय जनगनगना झाली पाहिजे, ओबिसीसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, ओबीसीचा बॅकलॉग भरण्यात यावा, कमी झाालेले राजकिय आरक्षण पुर्ववत करावे, ओबीसी कर्मचा—यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे, आठ जिल्ह्यातील कमी झालेले आरक्षण,आॅल इंडिया मेडिकल कोटा मध्ये ओबिसी कमी झालेले सिट, रोहिणी आयोग रद्द करून नविन आयोग तयार करावा अश्या विविध मागण्यांचे निवेदन उपविभागिय अधिकारी मूल यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना पाठविण्यात आले.
यावेळी सुनील शेरकी, विजय लोनबले,लक्ष्मण खोब्रागडे गंगाधर कुनघाडकर, गुरूदास चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन युवराज चावरे तर आभार जितेंद्र बल्की यांनी मानले.
यावेळी राष्टीय ओबीसी महासंघाचे सुनिल शेरकी, कैलास चलाख,युवराज चावरे,प्रा.विजय लोनबले,गंगाधर कुनघाडकर,जितेंद्र बल्की, जितेद्र लेनगुरे, लक्ष्मण खोब्रागडे,मंगेश पोटवार,नंदू रणदिवे,प्रशांत समर्थ,राकेश रत्नावार,घनश्याम येनुरकर,विनोद कामडे, प्रशांत बोबाटे,अखिल गांगरेडीवार, गुरूदास चौधरी,अनिल साखरकर,प्रशांत लाडवे,राकेश ठाकरे,विवेक मुत्यलवार,गौरव शामकुळे,प्रशांत गट्टूवार,जगदिश कडस्कर,रोहित निकुरे,राकेश मोहुर्ले,प्रभाकर धोटे, सचिन बोर्डावार आदी ओबीसी बांधव, नागरिक उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!