जांभुळघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड - १९ प्रतीबंधक लसीकरण कार्यक्रम बुधवार दि.(२३ जुन) पासून सुरू

५५ नागरिकांनी घेतली लस

तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)

चिमूर : - चिमुर तालुक्यातील जांभुळघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात नव्याने लसीकरण कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली असुन बुधवार दि.(२३ जून) सकाळी ९ ते सायंकाळी ५ वा. पर्यंत ५५ नागरीकांनी कोविड - १९ प्रतिबंधक लस घेतली. आज लस घेणाऱ्यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील ४९ व ४५ च्या पुढील ६ नागरिकांचा समावेश आहे.

१८ वर्षावरील सर्व नागरीकांना लसीकरण करून घेण्यासाठी पुठे यावे.असे आवाहान प्राथमिक आरोग्य केंद्रच्या आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!