वाघाच्या हल्यात वनरक्षक आणि गावकरी जखमी
ताडोबा बफर झोन अंतर्गत येत असलेल्या पळसगाव रेंज मधील पळसगाव येथे वाघाने चारणदास बनसोड यांना जखमी केले या ठिकाणी रात्री पासूनच तीन वाघाने बस्तान मांडले होते आज सकाळी लोक कामाला जात असताना हे तिन्ही वाघ दिसले त्यातील दोन वाघ पडून गेले तर एक वाघ तिथेच आहे त्याच वाघाने जखमी केले तसेच वनरक्षक सुनील गुजेलवार यांना सुद्धा जखमी केले बघ्याची गर्दी जमली आहे ही घटना आज दि 23 जून ची सकाळ ची असून जखमीना चंद्रपूर येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!