भरारी
भरारी
मोजतोय मी तारें नभातले,
रात्र जरी ढळूण गेली!
ही वादळांशी कसली मैत्री,
घरटं माझं ती मोडून गेली!
कशी उगवली पहाट माझी,
स्वप्न सारी विरून गेली!
मी स्तब्ध उभा चालतांना,
ती वाट माझी खोळून गेली!
एवढा झालोय एकटा,
सावली साथ सोडून गेली!
तरीही घेणार मी भरारी,
जरी पंख माझी गळुन गेली!
-✍️ K.Yash.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!