घरकुल यादीतून डावललेल्या 40 लाभार्थ्यांना न्याय द्या आमदार बंटीभाऊ भांगडीया याना दिले निवेदन



शंकरपूर( जगदिश पेंदाम)
वरून जवळ असलेल्या नवतळा ग्रामपंचायत येथील पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ड यादीतील पात्र घरकुल लाभार्थी यांचे नाव आणलाईन नोंदणी झाली असून पंचायत समिती घरकुल विभागाने 40 पात्र लाभार्थ्यांना अपात्र घोषित करून त्यांच्या घरांच्या स्वप्नांचा चुराडा केला आहे आणि त्यांना या योजनेपासून वंचित केले आहे या लाभार्थ्यांना न्याय मिळावा आणि योग्य ती चौकशी व्हावी यासाठी नवतला येथील माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य आणि गावकरी यांनी या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ भांगडीया याना निवेदन दिले 
           सविस्तर असे की ग्रामपंचायत नवतळा येथे पंतप्रधान आवास योजनेच्या  ड यादीचे  सर्व्हे करण्यात आला त्यानुसार 347 घरकुल लाभार्थ्यांची आणलाईन नोंदणी झाली त्यांना आणलाईन आय डी सुद्धा मिळाली  परंतु 6 महिन्यानंतर या संदर्भात ग्रामसेवक आणि सरपंच यांनी विचारणा केली असता घरकुल विभाग पंचायत समिती चिमूर यांनी आणलाईन  सर्वर खराब असल्याचे कारण सांगून उत्तर देण्याचे टाळाटाळ केली यानंतर 1 वर्षानंतर याबाबत माहिती विचारणा केली असता आणलाईन आय डी मिळालेल्या परंतु आणलाईन ड यादीत नाव न आल्यामुळे पात्र 40 गरीब  लाभार्थ्यांना अपात्र सांगण्यात आले  आहे   पण हे कसे घडले त्या लाभार्थ्यांना आणलाईन आय डी मिळाली आणि त्यांचे नाव सुद्धा ड यादीत होते मग आता ते अपात्र कसे त्यांचे नाव ड यादीतून गायब कसे झाले यामुळे गावकऱ्यात घरकुल विभागाविरोधात असंतोष निर्माण झाला आहे अशी माहिती महादेव कोकोडे यांनी निवेदनात सांगितली आहे 
       या सदर बाबीमुळे 40 घरकुल लाभार्थ्यांच्या घर बनवायच्या आशेवर पाणी फेरले आहे त्यांचे स्वप्न भंग पावली आहे त्यामुळे या बाबीची योग्य चौकशी होऊन या घरकुल लाभार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ भांगडीया याना निवेदन देण्यात आले आहे तसेच याची प्रतिलिपी मुख्य कार्यपालन अधिकारी जी प चंद्रपूर  विभागीय घरकुल विभाग अभियंता जी प चंद्रपूर व गटविकास अधिकारी प स चिमूर याना माहितीस सादर केले आहे यावेळी निवेदन देताना महादेव कोकोडे माजी सरपंच बंडू मेश्राम जगन कपाटे सुधाकर खेडकर दिवाकर नागोसे ओमप्रकाश ननकटे महादेव गुरनुले शाम लांजेवार आणि गावकरी उपस्थित होते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!