दिड पट खताच्या भाववाढ विरोधात आम आदमी पार्टीचे निवेदन भाववाढ कमी करण्याची मागणी
दिड पट खताच्या भाववाढ विरोधात आम आदमी पार्टीचे निवेदन
भाववाढ कमी करण्याची मागणी
मूल प्रतिनिधी
आाता पावसाळयात शेतीचा हंगाम सुरू होणार आहे आणि सरकारणी रासायनिक खतांचे भाव दीड पट वाढवुन शेतक—यांना लुटण्याचे काम चालु केले आहे, या करीता केंद्र सरकारने भाववाढ कमी करण्यासाठी आज मूल तालुका आम आदमी पार्टी तर्फे तहसिलदार मार्फत पंतप्रधान यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा युवा अध्यक्ष गौरव शामकुळे, मूल तालुका अध्यक्ष अमित राउत,प्रकाश चलाख,सचिन वाकडे,सुमित भगत आदी उपस्थित होते.
शेतकर्याला चांगला भाव मिळावा यासाठी उत्पादन खर्च नियंत्रित करणे गरजेचे आहे. त्यामुळे खताच्या किमती कमी असणे गरजेचे आहे. असे असतानाही तब्बल ५५ टक्केने खताच्या किमती वाढवल्या आहेत. यासोबत बियाणे व कीटकनाशक याचे भाव वाढण्याची शक्यता आहे . याचा परिणाम म्हणून सोयाबीनला हेक्टरी १४०० रुपये उत्पादन खर्च वाढू शकतो.
उत्पादन खर्चाचा बोझा उचलताना शेतकरी कोलमडून पडत आहे , पण आता या खत भाववाढीने छोटे शेतकरी सर्वात जास्त अधिक अडचणीत येणार आहेत . त्यातच कोर्पोरेट क्षेत्रासाठी पायघड्या अंथरणारी सरकारची नवी कृषी बिले आली आहेत. महामारी त्यातच पेट्रोल डीझेल च्या भाववाढीचा फटका बसलेला असताना या खताच्या भाववाढ थांबवण्याचे आदेश तातडीने दिले जावेत अशी मागणी आम आदमी पार्टी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!