तेंदुपता संकलन करतांना महिलेवर वाघाचा हल्ला
तेंदुपता संकलन करतांना महिलेवर वाघाचा हल्ला
महिला गंभिर जखमी
गेवरा परीसरातील घटना
प्रतिनिधि
जितेंद्र पेंदाम
सावली तालुक्या तिल गेवरा येथिल परीसरात तेंदूपत्ता संकलनाचे काम जोमात चालु आहे. त्यामुळे नागरीक मोठ्या प्रमाणात जंगलात तेंदुपता संकलन करण्याकरता जातात .आजही नागरीक तेंदूपत्ता संकलनाकरीता नागरीकासोबत शंकुतला दिवाकर चौधरी वय 50 , ही महीला गेली होती .तेंदुपता संकलन करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने गोसीखुर्द नहराजवळ हल्ला केला .त्यात ती गंभिर जखमी झाली.
त्या महिलला प्रथम अंतरगाव येथिल प्राथमिक उपचार केंद्रामध्ये भरती करण्यांत आले. त्यानंतर तिला गडचिरोली येथिल रूग्णालयात पाठविले.
सदर घटनेने परीसरात दहशत पसरली असुन जखमी महिलेल नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!