वाघाच्या हल्ल्यात महिला ठार



सिंदेवाही (शांताराम आदे /शशिकांत बतकमवार)
सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी कोके येथे आज वाघाने तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या महिलेवर हल्ला करून जागीच ठार केले. सीताबाई गुलाब चौके असे मृतक महिलेचे नाव आहे
ब्रह्मपुरी वनविभाग सिंदेवाही वनपरिक्षेत्र नवरगांव उपक्षेञातील पेन्ढरी कोके बिटामधील दिवान तलाव परीसरात वाघाने हल्ला करून तेंदुपत्ता गोळा करीत असलेल्या सिताबाई गुलाब चौके पेन्ढरी कोके हिला ठार मारले. हि घटना आज दि 19 मे ला सकाळी ८ वाजता च्या सुमारास घडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!