सिन्देवाही पोलीसांची अवैध्य दारूवरील धडक कार्यवाही सुरूच

सिन्देवाही पोलीसांची अवैध्य दारूवरील धडक कार्यवाही सुरूच

4,67,0000 रूपयांचा मुद्देमाल केला जप्त



सिंदेवाही (शशिकांत बतकमवार) 
सिंदेवाही पोलीस विभागाचा अंतर्गत येत असलेल्या विविध ठिकाणी दोन महिन्यापासून  अवैध हातभट्टी मोहा दारू देशी दारू विरोधात अभियान सुरू आहे.

 सदर अभियानांतर्गत सरडपार , वासेरा, मोहाडी, शिवनी अशा विविध ठिकाणी अवैध देशी दारू विकणाऱ्यांच्या घरी तसेच जंगल परिसरामध्ये मोठ्याप्रमाणात हातभट्टी, मोहा दारू काडणार्‍याविरुद्ध सींदेवाही पोलिसांनी आज विशेष मोहीम राबवली दारूबंदी कायद्यांतर्गत अनेक हातभट्ट्या उधवस्त व जप्त करून एकूण चार गुन्ह्याची नोंद केली आहे. यामध्ये मोहा दारू, मोहा सडवा, रसायन हात भट्टी साहित्य असे एकूण चार लाख 67 हजार पाचशे रुपये मुद्देमाल जप्त केलेला आहे. पोलिसाच्या या कारवाईमुळे अवैद्य दारू काढणारे व विक्री करणारे गुन्हेगार याच्यामध्ये दहशत व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  पोलिसांच्या या अभियानाची सर्वत्र कौतुक केले जात आहे सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार योगेश घारे, पीएसआय गोपीचंद नेरकर, पोलीस शिपाई ज्ञानेश्वर ढोकळे, सतीश निनावे, राहुल रहाटे, मंगेश श्रीरामे, अरविंद मेश्राम यांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!