पाण्याचे टाकीतील स्लॅब कोसळून मजूर ठार



मूल (प्रतिनिधी)
मूल तालुक्यातील केळझर येथील नदीवर असलेल्या पाण्याची टाकीतील स्लॅब कोसळल्याने मोटर पंप लावण्यासाठी गेलेल्या पुंडलिक मराठे (२५) या मजूर युवकाचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना आज सकाळी ९ वाजताच्या दरम्यान घडली.
मृत पावलेल्या पुंडलिकचा आज वाढदिवस होता हे विशेष. वाढदिवसाचे दिवशीच दुर्दैवाचा घाला मराठे कुटुंबीयांवर आला.


मजुराच्या मृत्यूची वार्ता गावात कळताच, सरपंच काजू खोब्रागडे सह  गावकरी घटनास्थळी गोळा झाले असून, जोपर्यंत मृतकाच्या वारसांना भरपाई दिली जात नाही तोपर्यंत प्रेत उचलू देणार नाही अशी भूमिका घेतली. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नायब तहसीलदार पवार,  मूल पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजपूत, संवर्ग विकास अधिकारी यांनीही घटनास्थळी उपस्थित झाले.
अखेर ग्रामपंचायतीने मृतकाचे कुटुंबीयाना रुपये एक लाख रुपये मदत आणि ग्रामपंचायत मध्ये जागा रिक्त झाल्यावर नौकरी देण्याचे मान्य केल्याने
ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्याची भूमिका घेतली


मागील तीन-चार दिवसापासून केळझर येथील पाणीपुरवठा करणारे मोटर पंप बिघडल्याने हा पंप दुरुस्त करून आज ग्रामपंचायतच्या कर्मचारी पुंडलिक मराठे यांना सोबत घेऊन पंप लावण्याकरिता गेला. मोटर पंप लावीत असताना आधीच जीर्ण व क्रॅक असलेली पाण्याची टाकी कोसळल्याने त्यात पुंडलिक मराठे ५० फूट आत पडून दबून जागीच ठार झाला.
पुंडलिक मराठे याला दोन वर्षाचा एक आणि एक वर्षाचा एक असे दोन लहांनगे मुल असून, त्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!