मेहाबुजरुक येथे आणखी एक दगावला; एकूण पाच जणांचा तापाने मृत्यू

मेहाबुजरुक येथे आणखी एक दगावला; एकूण पाच जणांचा तापाने मृत्यू 

150 जणांची चाचणी; 16 जण पॉझिटिव्ह 


सावली/ प्रतिनिधी 
तालुक्यातील मेहा बुज हे अख्खे गाव तापाने फणफणत असल्याचे वृत्त सोशल मीडियाच्या माध्यमातून वायरल झाल्यानंतर तालुका प्रशासनाने रविवारी तातडीने चाचणी शिबीर घेतले. यात एकूण 150 जणांची चाचणी करण्यात आली. यात 16 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.  दरम्यान तापाच्या साथीने आणखी एक दगावला. एकूण मृतांची संख्या पाच झाली आहे. आजच्या मृतकाचे नाव श्रीधर मेश्राम असे आहे. 

तालुक्यातील दीड हजार लोकसंख्या असलेल्या मेहा  बु.येथे गत २ आठवड्यापासून तापाच्या साथीने हैराण झाले आहे. तापाच्या साथीने गावातील आबाजी पेंदाम, हरबाजी कोलते, शेख रहीम कुरेशी, काशिनाथ भोयर, श्रीधर मेश्राम यांचा मृत्यू झाला. तालुका प्रशासन आणि आरोग्य विभागाने गावात विशेष शिबिर लाऊन आरोग्य तपासणी सुरू केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!