पारडी येथे वीज कोसळल्याने बैलचा मृत्यू
सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )
सावरी : - वरोरा तालुक्यातील पारडी ( साखरा ) येथे ८ मे २०२१ रोजी रात्री १० वाजता च्या सुमारास दिवाकर भुते याचे बैल घरी बांधून असताना वीज कोसळून एक बैल मृत्यू-मुखी पडला. कोरोना आणि नापिकी चालू असतानाही या वर्षाला शेतकरी संकटात आहे तरी दिवाकर भुते यांच्या ४५ हजार रुपये किंमतीचा बैल वीज कोसळून मरण पावला असून या संकटाच्या समयी शासनकडून अनुदान देण्यात यावे अशी गावातील शेतकरी तसेच बैल मालकाची मागणी आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!