होय हीच ती माय माझी हीच ती माय माझी
होय हीच ती माय माझी
तप्त उन,
घामाघूम झालेला फाटका पदर,
अख्खा सूर्य डोक्यावर घेऊन,
राब - राबून अनवाणी पायाने
तुडवीत येते रस्ता,
आणि हळूच तोंडातून शब्द बाहेर पडतो अस्पष्ट,
बाबा रे कोठे आहेस? बरा आहेस ना ?
हीच ती माय माझी
होय हीच ती माय माझी
राब राबणारी ही माय माझी,
अविरत करत असते कष्टl
तहान, भूक, कसली ना तमा तिला,
मुलाचं आयुष्य घडवणयात व्यस्तll
हीच ती माय माझी
होय हीच ती माय माझी
अरे,
कधी आकाशातील सुर ..आवाज करणारा विमान,
तर कधीं भुर्र...कन उंच भरारी घेणारा पक्षी ,
माय अलगद बघते
भविष्यातील अधिकारी मायेला,
सतत माझ्यात दिसतेll
अशी ही माय माझी
हीच ती माय माझी
- कवी विनोद ठाकरे
मू.पो. डोंगरगांव त. मुल
चंद्रपूर



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!