जिल्हा दारू बंदी असतांना काही बिट जम्मादार झाले माला - माल
तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)
चिमूर : - चंद्रपूर जिल्हा दारू बंदी झाली तेव्हा पासुन काही बिट जम्मादार माला - माल झाल्याचे दिसुन येत आहे.ठाणेदारा पेक्षा बिट जमादार हे लखपती झाले असल्याची चर्चा सध्या जोरात ठिक - ठिकाणी सुरू आहे.यांचे कारण अश्या प्रकारचे आहे कि एका बिट जम्मादाराच्या हद्दीत कमीत कमी दहा ते पंधरा गाव येत असतात. बरेचश्या गावा मध्ये दारू व सट्टा जोमाने सुरू आहे.एका गावात १० ते १५ दारू व सट्टा व्यवसाय करणारे लोक असतात.त्यात एक दारू पुरवठा (डिलर) असतो सर्वांचे सोबत बिट जम्मादाराचे सबंध जवळचे असतात. प्रत्येक व्यवसायिकांकडून ५ ते १० हजार रूपये व अवैध रित्या दारू पुरवठा करणाऱ्या कडून वेगळी देणगी बिट जमादाराला मिळत असल्याची चर्चा गाव पातळीवर सुरू आहे.यांना मोलाचे सहकार्य करणारे काही तंटामुक्ती अध्यक्ष व टपोरी दलाल असतात.त्यांना सुध्दा त्यांचा मोबदला मीळत असतो.काही बिट जमादाराची तर पगाराची तारीक चुकू शकते पण हप्त्याची तारीख चुकत नसते.तात्काल सुचना येतात अबी के अभी होणा नाही तर आपला धंदा बंद करा अशा प्रकार ची धमकीच येत असते.न दिल्यास त्यांची रेड टाकून हजारो रूपये घेऊन जातात.त्यामुळे जे धंदा करतात ते लोक ठरलेल्या तारकेवर देत असतात. याच्याच आधारा वर काही - काही जम्मादार १०-१५ लाखाच्या चार चाकी वाहानात फिरीत असतात.म्हणूनच दारू बंदी असतांना सुद्धा काही दारू तस्कर व जम्मादार,पोलीस लखपती झाल्याचे दिसुन येत आहे.यांचेवर कारवाई का शासन का करीत नाही ? हिच शासनाची कमतरता आज बघावे तिकडे दिसून येत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!