बँकेच्या ग्राहक सेवा केंद्र संचालकांना ५० लाखांचा विमा मंजूर करावा - नागेंद्र चट्टे
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील खडसंगी या ग्रामीण भागात मिनी बँक म्हणून ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यात आली आहे. या मिनी बँक ग्राहक सेवा केंद्राचे संचालक बँकेतील अडलेले काम पूर्ण करून देत असतात. सध्या अनेक नागरिक बँकेत कमी पण ग्राहक सेवा केंद्रात जास्त दिसून येतात. यामुळे ग्राहक सेवा केंद्राच्या संचालकांनासुद्धा या साथरोगाची लागण होऊ शकते म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५० लाखांचा विमा शासनाने मंजूर करावा, अशी मागणी एस.बी.आय. ग्राहक सेवा केंद्राचे संचालक नागेन्द्र चट्टे यांनी निवेदनाद्वारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!