लस घेण्यापूर्वी रक्तदान करणे गरजेचेच - स्वप्नील घोसे रक्तमित्र ( टायगर ग्रुप गडचिरोली )


चंद्रपूर : - महाराष्ट्र शासनाने १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांना कोविड लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. दुसरीकडे ज्या व्यक्तीने लसीकरण एकदा घेतल्यानंतर त्याना जवळपास ४५ दिवस तरी रक्तदान करता येत नाही. त्यामुळे राज्यात काही दिवसात मोठ्या प्रमाणात ब्लड बँक मध्ये रक्ताचा खूप तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा नागरिकांनी लसीकरण करण्यापूर्वी रक्तदान व शक्य असल्यास प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन टायगर ग्रुप गडचिरोली चे रक्तमित्र स्वप्नील घोसे यांनी केले आहे. रक्तामधील प्लाझ्माची मागणी कोविड १९ या रुग्णासाठी मोठ्या प्रमाणात कोविड हॉस्पिटल मधून वाढलेली दिसत आहे. जास्तीत जास्त तरुण मंडळींनी रक्तदान करण्यास समोर यावे अशी टायगर गृप ची मागणी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!