तालुक्यातील प्रत्येक गावोगावी आरोग्य शिबिराचे आयोजन करा तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकळे आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष रोशन येवले यांनी केली मागणी
चंद्रपूर : - आपणं जाणताच की सध्या आपल्या तालुक्यात कोरोनाच्या साथीने थैमान घातले असून अनेक गावांत तापाची साथ पसरलेली आहे. लोकांना आरोग्य विषयक मूलभूत सुविधा वेळेवर उपलब्ध होत नसल्याने कोरोनाचा प्रसार हा वाढतो आहे. लाॅकडाऊनमुळे लोकांचा रोजगार सुध्दा बुडालेला आहे.शेतीतील कामे वेळेवर होत नसल्याने
गावकरी संभ्रमात पडलेले आहेत.यंदाचा हंगाम कसा करायचा या विवंचनेत शेतकरी पडले आहेत.
यात तापाने भर घातलेली आहे.
राजुरा तालुक्यातील विहीर गावात महिनाभरात पंधरा जणांचा मृत्यू कोरोनाने झालेला आहे.देवाडा आरोग्य केंद्राअंतर्गत मंगी(बुज.), चंदनवाही,पांढरपौनी, पाचगाव,हरदोना, मुठरा, खामोना,अहेरी,टेंबुरवाही, विरूर रोड इत्यादी गावांमध्ये तापाने थैमान घातले आहे.आरोग्य केंद्र विरूर स्टेशन अंतर्गत, चिंचोली,कविटपेठ, धानोरा, सुब्बई इ.गावांमध्ये तापाची साथ पसरलेली असून या गावांमध्ये आरोग्य शिबीरांचे आयोजन करणे आवश्यक झाले आहे.गोवरी सारख्या गावात आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आल्याने येथील तापाची साथ नियंत्रणात आलेली आहे.
करीता आम आदमी पार्टी,शाखा राजुरा च्या वतीने आपणांस निवेदन देण्यात येत आहे की आपणं याकडे बाबींकडे गांभीर्याने लक्ष घालावे. तसेच गावोगावी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात यावे.पावसाळा तोंडावर आल्याने यांस प्राथमिकता देणे आवश्यक झाले आहे.अन्यथा लाट आटोक्यात येणे कठीण होईल. आरोग्य शिबीर आणि लसीकरण दोन्ही कार्यक्रम हाती घेण्यात यावेत अशी मागणी आम आदमी पक्षाचे संस्थापक सदस्य मिलिंद गडडमवार सर राजुरा विधानसभा अध्यक्ष प्रदीपभाऊ बोबले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष रोशन येवले शेतकरी आघाडीचे तालुका अध्यक्ष स्वप्नील कोहपरे तालुका संघटनमंत्री पवन ताकसांडे तालुका सचिव तुळशीराम कनाके तालुका उपाध्यक्ष सुरेश लोखंडे संतोष तोगर तालुका कोषाध्यक्ष श्रीकांत नक्कलवार यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!