ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जाणारा पीक अप पलटी;एक ठार
तळोधी (यश कायरकर) :
चंद्रपूर येथील शैकीनदास शिवाजी शंभरकर यांचा मालकीची पीक अप MH-34-AV2027 क्रमांकाची गाडी चंद्रपूर येथील MIDC मधून 44 सिलेंडर ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेत असताना झालेल्या अपघातात एक मजूर जागीच ठार झाला... गाडीचे चालक शशिकांत शंभरकर हे 12/5/2021 रोजी रात्री 10.30 वाजता एमआयडीसी चंद्रपूर येथून सिलेंडर ने भरलेली पीक अप गाडी घेऊन निघाले असता सिंदेवाही पर्यन्त शशिकांत शंभरकर यांनी गाडी चालवली मात्र थकवा आल्याने त्यांनी रोजीने त्यांच्या गाडीवर येणाऱ्या सुशांत सोरदे याला गाडी चालवायला दिली... गाडीच्या मागील भागात सागर वेटी व सिद्धांत वाळके हे बसलेले होते..!!! रात्री 2.30 वाजताच्या सुमारास नागभीड वरून ब्रम्हपुरी कडे जाता असताना नवेगाव पांडव फाटा ते कोर्धा गावाच्या मधात डुक्कर गाडीसमोर आल्याने चालकाचा नियंत्रण सुटल्याने पीक अप गाडी रोडच्या खाली जाऊन विरुद्ध दिशेने पलटी झाल्याने गाडीच्या मागच्या डाल्यात बसला असलेला सागर वेटी याचा यात मृत्य झाला..!!
दरम्यान घटनास्थळी नागभीड नागभीड पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केलेला असून पुढील तपास पि.एस.साय. खेडीकर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे..!!
===================



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!