जांभुळघाट भिसी 'टि' पॉईंट वर मिर्ची तोडणाऱ्या मजुराणी केला रस्ता रोको आंदोलन

मजुरांनी रोजगाराची केली मागणी

ठेकेदारानी आपल्या व्यवसायासाठी महीला मजुरांना समोर करून त्यांच्या जिवाशी खेळ करीत आंदोलन केले

उपविभागीय अधिकारी हे तात्काल घटनास्थळावर येऊन मजुरांची समज काढली व मजुरांनी रस्ता खुला केला

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - आज दि.१२/०४/२०२१ ला अचानक चिमुर तालुक्यातील मौजा जांभुळघाट येथील मिर्ची सात्रा वरील महीला मजुरानी भिसी टी पॉईंट वर चिमुर - कांपा रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आला. कोणत्याही प्रकारची कोणतीही सुचना न देता अचानक रस्ता रोको आंदोलन करण्यात आला.असून मिर्ची सात्रातील महीला मजुरानी लॉकडाऊन मुळे आमचा रोजगार हिरावणार व रोजगार बंद पडणार या भितीने ठेकेदाराच्या सल्याने रस्ता रोको आंदोलन करण्यात आला.काही वेळेपर्यंत रस्ता रोकण्यात आला. काही गाड्या थांबविण्यात आल्या.या घटनेच्या मागे मिर्ची सात्रा च्या ठेकेदाराचा सल्ला असल्याचे यावरून कळते.कारण ठेकेदार आपल्या व्यवसायासाठी महीला मजुरांना समोर करून मजूरांच्या जिवाशी खेळ खेळत असल्याचे दिसुन येत आहे.
या घटनेची माहीती मीळताच चिमुर तालूक्यातील उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी तात्काल घटणास्थळ गाठून आंदोलनकर्त्या महिला मजुरांना भेट देऊन मजुर महीलांना कोरोना महामारी बद्दल ची माहिती देण्यात आली. व समज देऊन त्यांच्या बद्दल उपाय योजना समजुन सांगण्यात आल्या.त्या नंतर रस्ता मोकळा करण्यात आला.ठेकेदाराना बोलावून त्याला कोरोना ( कोविड ) - १९ चे नियम पाळण्याच्या सुचना व उप विभागीय अधिकारी यांचे कडून देण्यात आल्या व पोलीसांना सुद्धा दूरध्वनी द्वारे याबाबतची सुचना दिली.आणि अशाप्रकारे शांतता राखण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!