घरात घुसून वाघाचा हल्ला महिला गंभिर जखमी
घरात घुसून वाघाचा हल्ला महिला गंभिर जखमी
खैरी येथील घटना
पुन्हा मानव वन्य जीव संघर्ष
पवनपार परीसर ठरतोय वाघ हमल्याचे हॉटस्पाट
पवनपार/सिंदेवाही प्रतिनिधि जितेंद्र पेंदाम
सिंदेवाही वनपरिक्षेत्राअंतर्ग येत असलेल्या खैरी येथे रात्रोला वाघाने हमला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. सुनंदा मेश्राम वय 60 वर्ष असून ती खैरी येथील आहे.
परीसरातील हा तिसरा हमला आहे.
मागील हप्त्यात वाघाने एकाच कुटूंबातील दोन व्यक्तीवर काका पुतन्यावर हमला करून ठार केल्याची घटनेची शाही वाळत नाही तर वाघाने हमला करून खैरी येथील महिलेवर रात्रोच्या सुमारास सुनंदा मेश्राम ही गाढ झोपेत असतांना वाघाने हमला करून गंभिर जखमी केले. त्यापुर्वी त्या वाघाने शेळीवर हमला केला .हमला करून घरातील दरवाज्यावर थाप दिली.कुनी तरी आलं असं सुनंदाला वाटलं .बघतो तर तिला वाघ दिसला. काही कळायच्या आत तिच्यावर हमला केला. त्यानंतर आरडा ओरड करताच गावकरी लोकांनी त्याला परतवून लावलं. तिला उपचाराकरीता रूग्नालयात भरती करण्यांत आले आहे.
सदर परीसरात तिसरी घटना असून परीसरात भितीची दहशत पसरली आहे.
पुन्हा या घटनेने मानव व वन्यजीव संघर्ष सुरू झालाअसल्याचे चर्चिल्या जात आहे.
जंगलातले वाघ आता गावात येवू लागल्याने आता जगायचे कसे असा प्रश्नही या निमित्याने उपस्थीत केल्या जात आहे.
अशा घटना घडल्या की वनविभागाकडून जंगलात न जाण्याचा सल्ला दिला जातो.परन्तु गावात घटना घडल्यावर आता गावच सोडायचे का असाही नागरीकांत चर्चा सुरू आहे.
वनविभाग या घटनेकडे गांभिर्याने घेतील काय की असाच मानव वन्यजीव संघर्ष सुरू राहील ही येनारी वेळच ठरवेल.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!