भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली समतेची शिकवणुक स्विकारणे हीच खरी आदरांजली - संजय गजपुरे
तळोधी बा. (यश कायरकर)
भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती दिनाचे औचित्य साधुन नागभीड तालुक्यातील नवेगाव हुंडेश्वरी येथील बौध्द विहारासमोरील चावडीचे लोकार्पण जि.प.सदस्य व भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.
तत्कालिन पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मंजुर केलेल्या खनिज विकास निधीतुन तसेच खासदार अशोकभाऊ नेते व आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या मार्गदर्शनात जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या पाठपुराव्याने नवेगाव हुंडेश्वरी येथील सदर काम पुर्णत्वास नेण्यात आले . या चावडीच्या लोकार्पण प्रसंगी संजय गजपुरे यांनी जनतेला दिलेला शब्द पुर्ण होत असल्याचा आनंद व्यक्त करीत भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली समता व बंधुत्वाची शिकवण स्विकारणे हीच खरी आदरांजली या महामानवाच्या जयंतीदिनी योग्य ठरेल असे प्रतिपादन केले.
यावेळी संजय गजपुरे यांच्या हस्ते निळ्या झेंड्याचे ध्वजारोहन करण्यात आले तसेच तथागत भगवान गौतम बुध्द व भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. याप्रसंगी नवेगाव हुंडेश्वरी च्या सरपंच सौ.कलुबाई नेवारे , उपसरपंच मंगल बुराडे, पोलीस पाटील सौ.शारदाताई चौधरी, कृऊबास संचालक धनराज ढोक, शक्ती केंद्र प्रमुख गुरुदेव नागापुरे, वनरक्षक पाटील , बौध्द कमेटीचे अध्यक्ष रविंद्र लिंगायत , कैलास भाऊ सोनुले , दिवाकर घोरमोडे, राजुभाऊ सोनुले यांच्यासह गावातील नागरिकांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी उपसरपंच सौ.आशाताई चहांदे व त्यांच्या चमुने बुध्दवंदना व भीमगीत गायले. कार्यक्रमाचे संचालन प्रितम गाडगे यांनी केले तर आभार ग्रा.पं.सदस्य सतिश गायकवाड यांनी मानले.
============



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!