नागभीड नगर परिषद क्षेत्रात 19 पासुन एक आठवडा जनता करफू घोषित स्थानिक तालुका प्रशाशन, नप प्रशाशन, विविध संस्था/संघटना व नागरिकांचा पुढाकार
नागभीड नगर परिषद क्षेत्रात 19 पासुन एक आठवडा जनता करफू घोषित
स्थानिक तालुका प्रशाशन, नप प्रशाशन, विविध संस्था/संघटना व नागरिकांचा पुढाकार
नागभीड : तालुका प्रशाशन व नगर परिषद प्रशाशन, विविध सामाजिक संस्था/संघटना नागरिकांच्या वतीने नागभीड नगर परिषद क्षेत्रात येत्या सोमवार दि. 19 एप्रिल पासुन तर 25 एप्रिल पर्यंत एक आठवड्याचा जनता कर्फु घोषित केला आहे.
नप क्षेत्रात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे गंभीर परिणाम होऊन येथील जनजीवन विस्कळीत होत आहे. कोरोनाच्या या महामारीत काही नागरिक/चीर तरुणांनी आपले प्राणही गमावले आहे. आता यापुढे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाची साखळी/चैन ब्रेक करणे या हेतूने सदर जनता करफू चे प्रयोजन करण्यात आले आहे. तथा नागभीड नगर परिषद क्षेत्रातील समस्त नागरीक, आस्थापना, दुकानदार, भाजीपाला/फळ विक्रेते यांनी दिनांक 19/04/2021 ते 25/04/2021 पर्यंत जनता कफर्यु चे नियम व निर्बंधाचे पालन करावे असे जाहीर आवाहन केले आहे. सदर कालावधीत नगर परिषद क्षेत्रातील शासकीय कार्यालये, मेडीकल,पॅथालॉजी, दवाखाने इत्यादी आस्थापने वगळून इतर सर्व आस्थापना /दुकाने/मिरची सातरे/बांधकामे पुर्णपणे बंद राहतील. तसेच या कालावधीत आस्थापना दुकाने सुरू ठेवल्यास दंडात्मक कारवाई करून सदर दुकाने आस्थापना कायमस्वरूपी बंद करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी असे प्रशाशनाने सुचित केले आहे.
जनता करफू सशस्वी करण्यासाठी नागभीड चे नागरिक, विविध संस्था, संघटना, लोक प्रतिनिधी, व्यापारी बांधव व सर्वांनी सहकार्य करावे असे प्रशाशनाने जाहीर आवाहन केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!