दगड़
पत्रकाराच्या लेखणीतून
यश कायरकर
"पुन्हा लहान झालास काय आज.?" आई माझ्यावर ओरडली.. "बघानं ब्रश करून चहा प्यायचे सोडून, सकाळीच दगड स्वच्छ करीत बसलेत लहान मुलांच्या सारखे." कवितानेही आईच्या सुरात सुर मीळवीला.
मी मात्र दगडात हरवून गेलो. 35-40वर्षी पुर्वी च्या आठवणी ताज्या झाल्या. शाळेला सुट्टी असली की गावाशेजारच्या नदी-नाल्यात वनवन भटकायचं आणि शोधायचा रंगी-बेरंगी,चापट-गोल, चमकनारे, वेगवेगळी आकार-प्रकार असलेली दगड,दगड गोळा करून खिसे फाटेस्तोवर भरून घरी परत यायचा. आणि वडिलांच्या शिवी खायचा किवा कधी-कधी मारही खायचा. मात्र त्या दगडांना पाहिले की सारं काही आल्हाददायक होऊन जायचं.
हा छंद अजूनही 45 वर्षानतरही सुटला नाही.. आंगन असो की शेत, रस्ता असो की नदी पात्र, गांव असो की शहर, जंगल असो कि मैदान, दोन पाऊले पैदल चालायची असली की मी दगडच शोधत चालतो . मी कुठे ही प्रवासा ला गेलोकी बँग मधे, कार मधे, किंवा बाइक नी असलो की खिशातून आवडलेले एक तरी दगड़ घेऊनच परततो.
या दगडांनी मला लहानपणी च खूप काही शिकवीले...
त्यामुळे च मी आयुष्यातील वाटेवर भेटलेल्या काही दगडासारख्या मानसांनाही जपू शकलो, वाटेत ठेच लागली तरीही रस्त्वरच्या दगडांवर न रागावता आपलीच पाऊले चुकीची पडली, हे मान्य करायला शिकलोय. आयुष्यात मीळतील, जुळतील तितके मित्र जपायला शिकलो.आणि हं वाटेवर चालतांना नेहमी जमिनीवर नजर ठेवून चालायला शिकलो.
मी आधीच मुलासी बोललोय, तु भविष्यात नौकरीसाठी गाव सोडसील,तरीही तु राहशील मात्र तिथं तुझ्या घराच्या दालनाच्या कुंडीमध्ये माझे दोन-तिन दगड पन ठेवून घेशील.
अशा आठवनी जपनार्या माझ्या दगडी खजिन्यामुळे मी मनाने गर्भश्रीमंत असल्याचे आत्मसुख मला मीळतो... आज या अडगळीत ठेवलेल्या दगडा़ंना पुन्हा कुरवाळतांना नकळतपने केव्हा माझे डोळे पाझरले मला कळलेच नाही.
✍️ यश कायरकर.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!