वलनी येथील दिश्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत



     नागभीड (प्रतिनिधी)         
चंद्रपुर मल्टीअर्बन निधी लिमिटेड शाखा नागभीडच्या वतीने वलनी ता.नागभीड येथील दिश्या सत्यवान भोयर ह्या मल्टीअर्बन शाखा नागभीडच्या सभासद असुन दिश्याचे पती सत्यवानची प्रकृती ठिक नसल्याचे व अत्यंत गरीबीची परीस्थिती असल्याने प्रविण तलांडे संस्था प्रतीनीधी दैनीक यांनी मल्टीअर्बन शाखा नागभीड येथे माहिती देऊन सत्यवानच्या दवाखान्याच्या औषधोपचाराकरीता आर्थीक मदत संस्थेच्या वतीने मिळवुन दिली.
           यावेळी मा.प्रविण शेळके कार्यकारी व्यवस्थापक चंद्रपुर मल्टीअर्बन लिमीटेड चिमुर,मा.होमदेवभाऊ मेश्राम ग्राम पंचायत सदस्य,श्री शंकरजी बोरकर पोलीस पाटील,यांचे हस्ते मदत देण्यात आली.
                 यावेळी गणेश हजारे,दिपक ठवरे,विश्र्वास जांभुळे,मोहन प्रधान,प्रविण तलांडे,अनिल ऊईके,देवानंद नरुके,भाष्कर ऊईके,दिशा भोयर,सत्यपाल व रसीका भोयर उपस्थित होते.गरीब कुटुंबाला मदत दिल्याने मल्टीअर्बन लिमिटेडचे भोयर कुटुंबानी आभार मानले.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!