पवनपार येथे वाघाच्या हल्यात दोन इसम ठार
पवनपार येथे वाघाच्या हल्यात दोन इसम ठार
एकाच परीवारातील घटना
पवनपार येथील पहिली घटना
गावालगत घटना पडल्याने गावकर्यात दहशत
मोहफुल वेचतांना घडली घटना
पवनपार परीसरात सर्वत्र हळहळ
परीसरात दहशत
जितेंद्र पेंदाम पवनपार प्रतिनिधि
सिंदेवाही वनपरिक्षेत्रा अतर्गत येत असलेल्या पवनपार येथे वाघाने एका मागुन एक इसमावर हल्ला करून एकाच परीवारातील दोन व्यक्तींना ठार केल्याची घटना सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली.
कमलाकर रूषी उंदीरवाडे , दूरवास धानू उंदीरवाडे या हमला करून ठार केलेल्या इसमाचे नाव आहे.
सदर घटना पवनपार ते खैरी या मार्गावर परंतू पवनपार गावाजवळ घडली.
सद्या मोहफुल गोळा करण्याचे काम पवनपार परीसरात जोमाने सुरू आहेत . गावात काम नाही त्यामुळे मोहफुल गोळा करून कित्येक कुटूंब आपली उपजिविका चालवितात .
आज सकाळीच पवनपार येथिल नागरीक मोहफुल गोळा करायला गेले होते.
जिथे घटना घडली हे ठिकान गावापासुन अगदी जवळ घडली.
सदर व्यक्ती गावालगतच मोहफुल गोळा करीत होते.
दबा धरून बसलेल्या वाघाने दोघावरही एकामागुन एक हल्ला केला. ते जागीच गतप्राण झाले.
दोन्ही शवांना उत्तरीय तपासनी करीता पाठवण्यात आले.
घटना पाहण्याकरिता पवनपार, गुंजेवाही, पवना, खैरी, टेकरी, सामदा या गावातील लोक आले असल्याने घटनास्थळी जत्रेचे रूप आले होते.
सदर घटनेने पवनपार व परीसरात गावात भितीची दहशत पसरली आहे.
वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.






वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा.
उत्तर द्याहटवा
उत्तर द्याहटवाम्रुतांच्या नातेवाईकांना वनविभागाने शासकीय नियमानुसार तात्काळ मदत द्यावी