जर रेती घाट लिलाव कायदेशीर आहे तर अधिकाऱ्यांचा सुगावा लागताच रेती चालक मालक फरार का होतात ?

==============================
जर रेती घाट लिलाव कायदेशीर आहे तर अधिकाऱ्यांचा सुगावा लागताच रेती चालक मालक फरार का होतात ?
==============================

चंद्रपूर : - गेल्या 5 दिवसापासून भारतीय क्रांतिकारी संघटनेतर्फे चंद्रपुर जिल्ह्य़ातील चिमूर तालुक्यातील काग सोनेगाव रेती घाटावर अवैध रेती तस्करी विरोधात, रेती घाट लिलाव प्रक्रियेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन संबंधीत अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान भरपाई देण्यात यावी अशा मागण्या घेऊन धरणे आंदोलन व बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. 
        ५ दिवस लोटूनही अधिकाऱ्यांनी अजूनही समाधानकारक उत्तर दिलेले नाही, नाही रेती घाटाची चौकशी केली मात्र पोलीस प्रशासन द्वारा उपोषणकर्त्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्याद्वारे विना त्रुटी रेती घाट लिलाव प्रक्रिया कायदेशीर झाल्याचे सांगितले जाते मग प्रश्न असा पडतो की जेव्हा कोणताही संबंधित अधिकाऱ्याचा रेती घाट उपोषण स्थळावर येण्याचा सुगावा लागताच १० मिनीटात ट्रक्टर गायब होतात व चालक, मालक पळ काढतात. ठिकाणावर तहसीलदार, पोलीस निरीक्षक, उपविभागीय अधिकारी व संबधित अधिकाऱ्यासोबत  माफियाद्वारे पोसलेली पिलावळ मिळून सोबत येतात व उपोषणकर्त्यांवर रुबाब दाखवून उलट तुमच्यावरच कारवाई करु अशी धमकी देतात यावरून माफिया व अधिकाऱ्यासोबत साठगांठ असल्याची दाट शंका वर्तवली जात आहे अशा बेजबाबदार अधिकाराचां गैरवापर करणाऱ्या, रेती माफियांना छुपा पाठिंबा देणाऱ्या अधिकाऱ्याला पदावरून बडतर्फ केले पाहिजे अशी जनमाणसात चर्चा रंगत आहे. 
           नेहमी प्रमाणे दिनांक 24/4 /2021 ला सकाळ पासून 10 ते 12 ट्रक्टरसह रेती उत्खनन सुरु होते. त्याच्यांकडे रायल्टी नाही. ट्रक्टरला नंबर नाही. कोणत्याही मजुर, चालक मालकाला मास्क नाही. सोशल डिस्टेंस नाही. असा प्रकार दररोज होत असल्याचे आढळून येत आहे आणि सर्रासपणे कलम 144  चे उलघ्घंन होत असल्याचे वारंवार माहिती दिली असतांना सुद्धा चिमूरचे तहसीलदार नागटीळक, पोलिस प्रशासन, नगर परिषद अधिकारी याकडे दुर्लक्ष करून डोळे झाक करीत आहे उलट चिमूरचे तहसीलदार संजय नागटीळक यानी उपोषण मागे घ्या अन्यथा कारवाई करू' असा नोटिस दिला. 
        भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा यानी आपले मत मांडताना म्हणाले, कि "माफियाद्वारे कलम 144 चे उलघ्घंन करून बेकायदेशीर नियमबाह्य अवैध रेती उत्खनन करणाऱ्यावर कसलीही कारवाई न करता शेतकऱ्यांसाठी, महिला सबलीकरणासाठी, जनतेच्या न्याय ह्क्कासाठी लढणाऱ्यावर कारवाई करण्यात येत असेल तर आम्ही न्यायाची अपेक्षा कुणाकडून ठेवायची?'' 
          यावेळी सन 2021 मध्ये झालेल्या बेकायदेशीर रेती घाट लिलाव प्रक्रियेची चौकशी प्रकरण जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यानी हाताळून भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी उपोषणकर्ते सांरग दाभेकर, कैलाश भोयर, टेरेन्स कोब्रा, विशाल भसारकर यानी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!