नांदेड तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त २४ एप्रिल २०२१ रोजी आयोजित रक्तदान शिबिरात एकुण १९ रक्तदात्यांनी केले रक्तदान


चंद्रपूर : - नांदेड तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त २४ एप्रिल २०२१ रोजी आयोजित रक्तदान शिबिरात एकुण १९ रक्तदात्यांनी रक्तदान केले.तसेच मास्क व सेनिटायजर चे वाटप करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन मा. संत बाबा तेजासिंगजी जत्थेदार गुरुद्वारा मातासाहिब, शर्मा पोलिस निरीक्षक मुदखेड पो.स्टे., यांच्या हस्ते व दत्ता पाटील सरपंच, एकनाथ बत्तलवाड उपसरपंच, चंद्रकांत पुंड ग्रामसेवक, विठ्ठल पाटील मोरे माजी सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष, ग्राम पंचायत चे सर्व आजि व माजी सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रक्तपेढी यांनी रक्त संकलन केले.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी नवयुवक भीमशक्ती जयंती मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
सुत्रसंचालन व आभार दत्तकुमार धुतडे यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!